मरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांच्यावरील तक्रार म्हणजे बिनगुडाचे आरोप...अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा व वेठीस धरण्याचा प्रकार

मरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांच्यावरील तक्रार म्हणजे बिनगुडाचे आरोप

 अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा व वेठीस धरण्याचा प्रकार 

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

मरवडे  येथील ग्रामसेविका सौ राखी सुनील जाधव यांच्या कामकाजाबाबत ग्रामपंचायत सदस्य सौ दिपाली समाधान ऐवळे यांनी प्रशासनाकडे लेखी व मेल द्वारे तक्रार करून जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असतात, या मिस्टर सदस्याचे कामकाज म्हणजे बालिश बहू बायकात बडबडल्यासारखे असते.त्यामुळे सदर तक्रारीबाबत सदस्यांनी खुलासा केला आहे.

 ग्रामसेवक जाधव मॅडम यांनी सहा महिन्यापूर्वी मरवडे ग्रामपंचायत चा पदभार स्वीकारलेला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी सो यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून महिला ग्रामसेविका मिळावे अशी वेळोवेळी विनंती केली कारण की मरवडे ग्रामपंचायतच्या 13 सदस्यांपैकी दहा सदस्य महिला आहेत, आणि महिला सदस्यांना काम करत असताना वेळोवेळी अडचणी येत होत्या त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी महिला ग्रामसेविकेची मागणी केलेली होती. सदर ग्रामसेविका यांनी ग्रामपंचायत चा पदभार स्वीकारल्यापासून कामामध्ये एकसूत्रपणा, गावातील पाणीपट्टी घरपट्टी वसुली, कर्मचारी यांचे वेतन, शासकीय देणे, पाण्याचे नियोजन, गावातील सर्व हातपंप दुरुस्ती, प्रशासकीय दप्तर व कागदपत्रे अध्यावत करणे, गावामध्ये ग्रामसभा मुख्य ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त ग्रामस्थांना सहभागी करून घेणे, विविध शासकीय कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने आयोजन करणे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन सर्व शासकीय योजनांची माहिती देणे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन प्रशिक्षण घेणे व उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भेटी देणे, एन एस एस कॅम्प चांगल्या पद्धतीने गावांमध्ये राबवणे, गावच्या विकासामध्ये भर टाकणाऱ्या कामांचे नियोजन करणे व प्रस्ताव तयार करून कामांची मागणी करणे, गावातील जास्तीत जास्त महिलांना सोबत घेऊन बचत गटाचे काम चांगल्या पद्धतीने राबवणे, विविध महिलांचे कार्यक्रम घेणे असे विविध कार्यक्रम घेत आपला जास्तीत जास्त वेळ गावातील कामांमध्ये व प्रशासकीय कामकाजामध्ये सदर ग्रामसेवक यांनी दिलेला आहे.

       परंतु दिपाली समाधान ऐवळे यांनी रस्त्यावरच घरकुलाचे बांधकाम केलेले आहे. सदर बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच या जागेचा मालकीचा उतारा मिळावा अशी मागणी वारंवार करत आहेत. त्याचबरोबर घरकुलाचे बिल मिळावे अशीही मागणी वारंवार करत आहेत दिपाली ऐवळे यांनी घरकुल रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण केले आहे स्वतः सदस्य असून त्यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांच्याविरुद्ध सदस्य अपात्रेचा कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे .

सदरची व्यक्ती ही एक जबाबदार व्यक्ती असून ग्रामपंचायत सदस्य आहे त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी अशा पत्रांद्वारे दबाव टाकून चुकीच्या पद्धतीची कामे करून घेण्याचे नियोजित आहे.दिपाली ऐवळे सदस्य असून त्यांचे पती समाधान ऐवळे हे ग्रामपंचायत कामकाजात लक्ष घालून ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामपंचायत कार्यालयाला लॉक लावतो अशी धमकी देत असतात.दिपाली ऐवळे यांचे पती ग्रामपंचायत  सरपंच यांच्या खोलीत बसून कर्मचारी यांना आदेश देत असतात.नियमबाह्य कामे करण्यास व चुकीची बिले काढण्यास त्यांच्याकडून सारखा तगादा लावण्यात येतो.त्यांच्यासोबत त्यांना ज्यांच्याकडून सहकार्य मिळत आहे अशी काही मंडळी आहेत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ व ग्रामपंचायतच्या मालकीची जागा बळकवणे ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करणे व शासकीय कामाचे नुकसान केलेले आहेत. त्यामुळे सदर सदस्य व इतर यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थापोटी चुकीचे काम करून घेणे कागदपत्रांमध्ये अदलाबदल करणे बोगस बिले उचलणे व अशी कामे करण्यास थांबविणाऱ्या ग्रामसेविकेची बदनामी करणे हा हेतू आहे. दिपाली समाधान ऐवळे या सदस्य सहा ते सात मिटींगला गैरहजर आहेत तसेच सतत ग्रामसभेला गैरहजर असतात त्यामुळे यांच्याकडून अपूर्ण माहितीच्या आधारे विविध आरोप केले जातात. तसेच ग्रामसेविका जाधव मॅडम यांनी गावासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त काम करून कोणतीही कामे पेंडिंग ठेवलेली नाहीत तसेच कोणत्याही सामान्य नागरिकांचे अडचण न करता चांगल्या पद्धतीने दररोज काम करत आहेत.

   तरी आपणास याद्वारे विनंती करण्यात येते की चांगले काम करणाऱ्या अधिकारी यांना त्रास देण्याचा मानस आहे.
--------------------------------------------------------------------------
मरवडे ग्रामपंचायत ने गेल्या तीन वर्षांमध्ये साडेचार कोटी रुपयांच्या कामांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. त्यामुळे दिपाली ऐवळे यांनी स्वतःच्या घरकुलाचे बिल काढण्यात मग्न राहू नये सर्वसामान्य जनतेने कामे करण्यासाठी निवडून दिले आहे त्यामुळे जनतेची कामे करावे व स्वतःचे आर्थिक हीत बाजूला ठेवावे.

सौ सुमन गणपाटील
मा.सरपंच ग्रामपंचायत मरवडे
--------------------------------------------------------------------------
दिपाली ऐवळे यांनी आपण ग्रामपंचायतचे सदस्यत्व आहोत आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडावेत स्वतःच रस्त्यावर घरकुल बांधून अनधिकृतपणे ग्रामपंचायतच्या मालकीची जागा हडप करू नये व सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये.

कु.दीक्षा शिवशरण
उपसरपंच ग्रामपंचायत मरवडे
--------------------------------------------------------------------------
ग्रामसेवक सौ.राखी जाधव मॅडम या प्रत्येक कामाचे व शासकीय योजनांची माहिती मासिक सभेमध्ये देत असतात. त्या स्वतः प्रत्येक कामामध्ये हिरारीने सहभागी होऊन आम्हा सर्व सदस्यांना सामावून घेतात. उत्कृष्ट काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतात व मॉडेल ग्रामपंचायत चे काम दाखवतात व नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी सतत कार्यशील असतात. महिला ग्रामसेविका आल्यापासून गावातील कामांमध्ये महिला सदस्य व गावातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निरपेक्ष भावनेने काम करत असल्यामुळे व कामामध्ये तत्पर असल्यामुळे तसेच बेकायदेशीर व चुकीच्या कामाला विरोध करत असल्यामुळे ग्रामसेवक मॅडम यांच्यावर खोटे व बिनबुडाचे,चुकीचे आरोप केले जात आहेत.

सौ मीनाक्षी सूर्यवंशी
मा. उपसरपंच ग्रामपंचायत मरवडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.