मंगळवेढा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद यांनी परजिल्ह्यात चारा विक्री रोखण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. यानंतर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख दत्तात्रय भोसले यांच्यासह प्रहार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी बी.आर.माळी यांना भेटून हा जाचक आदेश जुल्लेपर्यंत मागे घ्यावा,अशी मागणी केली आहे.याबाबत प्रांतधिकारी माळी यांनी सोमवारी निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले म्हणाले की, अगोदरच आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा चारा बंदी निर्णयामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
मंगळवेढा हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतीवर येथील शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चित होते. यंदाच्या वर्षी मजुरीचे दर कमालीचे वाढल्याने शेतकऱ्यांना शेती परवडणारी राहिली नाही.अशातच सरकारने सीमावर्ती भागातून चारा विक्रीसाठी परजिल्ह्यात जाऊ नये ,यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असणार आहेत. त्यामुळे कडब्यास मागणी घटली असून त्यामुळे कडब्याचे दर पडले आहेत. गेल्या आठवड्यात 15 ते 19 रुपये पेंडीचा दर आता या निर्णयामुळे 11 रुपये झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आलेला खर्च व विक्री किंमत याचा ताळमेळ बसत नाही.आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा, असे म्हटले आहे.यावेळी शिवसेना शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, प्रहार संघटना राजकुमार स्वामी यांच्यासह पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------
मंगळवेढा भागातील हजारो शेतकऱ्यांच्या कडब्याला दरवर्षी सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. जर जिल्हा चारा बंदीचा निर्णय अंमलात आला तर भागातील शेतकऱ्यांचा कडबा शेतात पडून राहिल. सरकार अशाप्रकारे शेतकऱ्याला अडचणीत आणत असेल तर मोठे आंदोलन करावे लागेल.
दत्तात्रय भोसले
शहराध्यक्ष, शिवसेना