मंगळवेढा / प्रतिनिधी -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी,राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने मंगळवेढा शहरातून रविवार दि १० मार्च रोजी सकाळी 10:45 ते 12:30 वाजेपर्यंत मंगळवेढा शहर, दामाजी नगर व चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील प्रमुख रोड वरून पोलीस स्टेशन, एसटी स्टँड, दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक ते नगरपालिका चौक येथून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा रेझिंग डे असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा रूट मार्च उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी शहरातून रुट मार्च काढण्यात आला.यावेळी मंगळवेढा पोलिस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशन कडील 06 अधिकारी 13 अंमलदार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील 02 अधिकारी 49 जवान आर.सी.पी चे 18 जवान, 09 होमगार्ड असे एकूण 08 अधिकारी 89 जवान उपस्थित होते.