मंगळवेढा /प्रतिनिधी :-
आज दै.दामाजी एक्सप्रेस करमाळा विभागीय कार्यालयाचा द्वितीय वर्धापनदिन सोमवार 11 मार्च रोजी साजरा होत असून यानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांना समाजरत्न,जेऊर येथील सुनिल ज्ञानदेव सावंत यांना सेवारत्न,जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या जयश्री कैलास सातपुते यांना शिक्षणरत्न,कंदर येथील जाकीर मुलाणी यांना शिक्षकरत्न,ज्येष्ठ पत्रकार अॅड.बाबुराव हिरडे यांना आदर्श पत्रकार, कंदर येथील दिपक शंकर यांना प्रयोगशील शेतकरी, जेऊर येथील शितल पांडुरंग जाधव यांना उत्कृष्ठ अभियंता, कंदर येथील रंगनाथ शिंदे यांना उद्योगरत्न, वांगी येथील प्रशांत तकीक यांना कलारत्न, वडशिवणे येथील गणेश पवार यांना उत्कृष्ठ निवेदक आणि केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयास आदर्श शाळा पुरस्कार जाहिर झाला असून सदर पुरस्काराचे वितरण सोमवार दि.11 मार्च रोजी सकाळी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते करमाळा येथील यश कल्याणी सेवा भवन येथे करण्यात येणार आहे.