जि.प.शाळा तावशी येथील आदर्श शिक्षक प्रकाश मोरे, उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी संजय क्षीरसागर यांचा मारापुर नगरीत सत्कार
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी गावचे सुपुत्र व तावशी येथील जि.प.शाळेतील शिक्षक प्रकाश मोरे यांना पंढरपूर पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. व अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून प्रा.संजय क्षीरसागर यांना उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून गौरवण्यात आले, त्याअनुषंगाने मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव व सहकाऱ्यांनी मारापुर येथे स्वागत पर सत्कार करण्यात आला.
यावेळी आदर्श शिक्षक प्रकाश मोरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले .तसेच घरनिकी येथील सुपुत्र असलेले तसेच पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात सामाजिक, शिक्षण, क्रीडा, राजकीय इत्यादी क्षेत्रात मैत्री पर संबंध जोडणारे प्रा. संजय क्षीरसागर यांची अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, उपसरपंच अशोक यादव, मारापुर विकास सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव ,मुख्याध्यापक हरिभाऊ घाडगे ,सिद्धेवाडी चे सुपुत्र तथा पिराची कुरोली येथे इंग्लिश स्कूल नागनाथ जाधव (सर ),प्रकाश पाटील सर ,शिक्षक बंधू-भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.