महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे तरी सोलापूर लोकसभेसाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या विद्यमान आमदार प्रणिती ताई शिंदे यांची उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जवळपास निश्चित झाली असून महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवेढ्यात आज दिनांक 19 मंगळवारी रोजी सायंकाळी 6 :00 वाजता जुन्या पोलीस स्टेशन समोर मारुती पटांगण येथे मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली.
यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार निरंजनजी टकले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य आमदार प्रणिती ताई शिंदे ,माननीय प्रकाशजी यलगुडवार यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच मंगळवेढा शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याला मंगळवेढा शहर व तालुक्यातील महिला व काँग्रेस कमिटीचे सर्व सेलचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान प्रशांत साळे यांनी केले आहे.