निवडणूकीत वार्तांकन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करू ;मंगळवेढ्यात पत्रकारांनी केली प्रतिज्ञा

निवडणूकीत वार्तांकन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करू

मंगळवेढ्यात पत्रकारांनी केली प्रतिज्ञा

मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-

देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी व राजकीय स्थिती या संदर्भात पत्रकारांची भूमिका कशी असावी यासंदर्भात मंगळवेढा येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची विचार विनिमय बैठक रविवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होवून यावेळी आपण वार्तांकन करताना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून अशी प्रतिज्ञा करण्यात आली.

यावेळी सद्य राजकीय स्थितीबाबत चर्चाही झाली.पत्रकारांनी आपले वृत्तपत्र, दैनिक,साप्ताहिक अथवा यु ट्यूब चॅनेल,वेब पोर्टल हे समाजाभिमुख असावे. आपण प्रसिद्ध केलेली बातमी परावलंबी असू नये त्यासाठी आपले अस्तित्व निर्माण करावे. पत्रकारांनी ठराविक नेते,पदाधिकारी,सत्ताधारी,लोकप्रतिनिधी, यांनाचा प्रसिद्धी देण्याऐवजी विरोधकांनाही न्याय द्यावा व समतोल साधून लिखाण करावे.एखादा धनाढ्य पक्षाने अथवा नेत्याने आचारसंहितेच्या कालावधीत जाहीराती ऐवजी पेड न्यूजच्या दिल्या तर त्या टाळाव्यात.
कांही नेत्यांच्या कार्यालयातील कर्मचारी,स्विय सहाय्यक मोजकी वृत्तपत्रे,यु ट्युब चॅनल व वेब पोर्टल हाताशी धरून हव्या तशा एकतर्फी बातम्या पसरविण्याचे काम करीत आहेत.त्यामुळे पत्रकारिता धोक्यात येत चालली आहे. सद्यस्थितीमध्ये वर्षभर अनेक पत्रकारांकडून नेते किंवा त्यांचे हस्तक हे आपल्या मर्जीप्रमाणे बातम्या प्रसिद्ध करून घेतात. मात्र एखादी बातमी न प्रसिद्ध झाल्यास संबंधित पत्रकाराकडे किंवा तो काम करीत असलेल्या वृत्तपत्राकडे जाणून बुजून दुर्लक्षित केले जाते. याबाबतही यावेळी चर्चा होवून प्रत्येकाने आपापली भमिका मांडली.

नोंदणीकृत वृत्तपत्रापेक्षा अनाधिकृत ऑनलाईन अंक,ब्लॉग,वेब पोर्टल,यु ट्यूब चॅनेल इत्यादींमुळे वाचकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अनेक बातम्या कॉपी पेस्ट करून नक्कल केली जात आहे.अशा अनेक बाबीवरही चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.