भाजपमध्ये काय चाललय ; शरद बनसोडेंना देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् अमर साबळे सागर बंगल्यावर दाखल

भाजपमध्ये काय चाललय ; शरद बनसोडेंना देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् अमर साबळे सागर बंगल्यावर दाखल


मंगळवेढा /प्रतिनिधी :-

भारतीय जनता पक्षाचा सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार निवडीचा पेच अजूनही सुटलेला नाही. दरम्यान सोलापूर उमेदवार निवडीचे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती दिली. सोलापूर राखीव लोकसभेसाठी 40 जण उमेदवारी साठी इच्छुक आहेत, त्यामुळे फडणवीस हे निर्णय घेतील, उमेदवार कुणी का असेना कमळ हाच उमेदवार समजून आम्ही सर्व काम करणार असल्याचे देशमुख म्हणाले.रविवारी सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती.

माजी खासदार शरद बनसोडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात छापून आल्या आहेत. बनसोडे यांनी या फोन कॉलचे मार्केटिंग करत वातावरण तयार केले आहे.


याच बरोबर सोलापूर साठी इच्छुक माजी खासदार अमर साबळे हे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.बराच वेळ त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या बातम्या सध्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित होत आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणूक घोषणा झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचेही नाव समोर येत आहेत. त्यामुळे आता उमेदवारीत नक्की बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.