सोलापुर जिल्ह्यात चर्चा ;आमदार प्रणितीताई शिंदे दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना

सोलापुर जिल्ह्यात चर्चा ;आमदार प्रणितीताई शिंदे दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अध्यक्ष निश्चित झालेला नाही. अजूनही सोलापूर अशा वावड्या उठल्या आहेत की, या लोकसभेसाठी महाविकास आघाडी मधून सोलापूरची जागा ही वंचित बहुजन आघाडीला सुटेल आणि प्रणिती शिंदे या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्या भाजपकडून सोलापूर लढवतील.

सोमवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य व उत्तर या मतदारसंघांमध्ये संकल्प सभेचे आयोजन केले होते. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट मध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिण मध्ये सुरेश हसापुरे, उत्तर मध्ये काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यामुळे ही संकल्प सभा यशस्वी झाली.परंतु आमदार प्रणिती शिंदे या सोलापूरचा दौरा अचानक सोडून दिल्लीला रवाना झाल्या. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सोमवार पर्यंत अशी ही चर्चा होती की, प्रणिती शिंदे शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टीमध्ये जातील परंतु अधिक माहिती घेतली असता असे समजले की, दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची महत्त्वाचे बैठक बोलवण्यात आली आहे. आणि आमदार प्रणिती शिंदे या वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्या दिल्लीला रवाना झाल्या.

भारतीय जनता पार्टीमध्ये जायचेच असते तर एवढे कार्यक्रम त्यांनी घेतलेच नसते आणि त्या निश्चित काँग्रेसकडूनच लोकसभा लढवणार आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा उमेदवार सोलापुरात नाही आणि त्या निश्चित निवडून सुद्धा येतील असा विश्वास ही माहिती दिलेल्या कार्यकर्त्यांने व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.