मंगळवेढा /सचिन. हेंबाडे :-
मंगळवेढा तालुक्यातील मौजे चिकलगी येथील अर्जदार चंद्रकांत मारुती कोळी व कोळी वस्ती ग्रामस्थ यांच्यावतीने चिखलगी शिरनांदगी रस्ता ते कोळी वस्ती हा रस्ता 25/15 निधी अंतर्गत मजूर असून रस्त्यासाठी ठराव व लागणारी कागदपत्रे मागणीसाठी निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालय येथे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
तरी सदरच्या रोडची नोंद गाव नकाशात आहे.कोळी वस्ती ही पूर्वीपासून त्या ठिकाणी आहे. कोळी वस्तीस दुसरा कोणताही रस्ता नाही. शासन निर्णयानुसार 20 वर्षापासून रस्ता असेल तरी त्या ठिकाणी संबंधीत शेतकऱ्यांचे परवानगी घेणे बंधनकारक नाही हे सर्व काही असताना देखील आपण कोणीतरी वैयक्तिक स्वार्थापोटी व राजकारणातून तक्रार दिल्यानंतर आपण जाणून-बुजून ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद नाही अशा प्रकारची बनवाबनवी ची माहिती देऊन आमच्या वरती अन्याय करीत आहात. गाव नकाशाला रस्त्याची नोंद आहे तरी देखील आपण ग्रामपंचायत नमुना नंबर 23 ला उपलब्ध नाही, जिल्हा परिषद किंवा राज्य सरकार यांच्याकडे नोंद नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे.
आपण सर्व शेतकऱ्यांची संमती घेणे आवश्यक आहे .शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर ग्रामपंचायत ठराव व सर्व आवश्यक कागदपत्र ठराव ग्रामपंचायत देण्यास बांधील आहे.असे म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या अज्ञातून काही आहे का जाणून-बुजून अडवणूक करण्याचे हेतूने म्हणत आहात काय? यांचा ग्रामपंचायतीने खुलासा करावा व आपण दिलेली नोटीस ही केवळ दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने दिलेली आहे असे दिसले तरी जोपर्यंत या सर्व बाबींचा विचार ग्रामपंचायतने करावा. रस्ता तयार करण्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे व ठराव संबंधित प्रशासन व अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून रस्ता मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे अर्जदार चंद्रकांत मारुती कोळी व कोळी वस्ती ग्रामस्थ यांनी म्हटले आहे.
यावेळी विश्वनाथ कोळी ,विठ्ठल कोळी ,तेजस कोळी, महादेव कोळी ,सत्याबापू कोळी ,दत्तात्रय कोळी, सुरेश जाधव ,दामाजी कोळी ,तानाजी कोळी ,शिवाजी कोळी ,रोहिदास कोळी ,राजेंद्र कोळी ,बळीराम कोळी, शंकर कोळी,श्रीमती राजश्री जाधव, लतिका कोळी अदिजन ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.