मंगळवेढा /प्रतिनिधी :-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, सोलापूर शहर मध्य कार्यकुशल हॅट्रिक आमदार प्रणिती ताई सुशीलकुमार शिंदे ह्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव भेट दौरा उद्या शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी आयोजित केला आहे.
त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे, सकाळी 9 :00 वाजता येड्राव, 9:30 वाजता खवे,10:00 वाजता जित्ती,11:00 वाजता निंबोणी,दुपारी 12:00 वाजता भाळवणी,12:30 वाजता हिवरगाव,1:30 वाजता खूपसंगी,2:00 वाजता जूनोनी,3:00 वाजता गोणेवाडी,4:30 वाजता लक्ष्मी दहिवडी,सायंकाळी 5:30 वाजता आंधळगाव,6:00 वाजता गणेशवाडी,6:30 वाजता शेलेवाडी,7:30 वाजता अकोला,8:00 वाजता कचरेवाडी असा त्यांचा गाव भेट दौरा आहे.
मंगळवेढा तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व गावकरी,नागरिक,बंधू महिला भगिनींनी, काँग्रेस प्रेमींनी, सर्व काँग्रेस, महाविकास आघाडी, मित्रपक्षाच्या, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.