तरूण मुलांची पाऊले विद्यालयातून मद्यालयात जाऊ देऊ नका :- राहुल गिरी

तरूण मुलांची पाऊले विद्यालयातून  मद्यालयात जाऊ देऊ नका :- राहुल गिरी


मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-

आज तरूण मुलांची पाऊले विद्यालयातून मद्यालयात जाऊ देऊ नका यासाठी तरूणांना शिवचरित्रच तारू शकणार आहे असे मत राहुल गिरी,बीड यांनी व्यक्त केले ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवचरित्र व आजची तरूणाई या विषयावरती व्याख्यानात बोलत होते.सुरवातीस प्रणव परिचारक यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पूजन करण्यात आले.

यावेळी राहुल गिरी म्हणाले ज्याला आईच्या डोळ्यातील स्वप्न कळाले त्याला शिवाजी महाराज कळाले महाराष्ट्राच्या इतिहासात ज्ञानोबा, तुकोबा व शिवबा हे तीन बा झाले म्हणूनच महाराष्ट्राची सुसंस्कृत वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या मातीला आज शिवविचारांची गरज आहे एकवेळ चंद्रावर डाग आहे. परंतू शिवचरित्रावर कोणताही डाग नाही ही शिवचरित्राची खरी महती आहे. पराक्रमाच्या मातीचा तीलक कपाळी लावुन तरूणांनी शिवचरित्रातून आदर्श घेतला पाहिजे. आपापसातील वाद संपविण्यासाठी आणि दुःखात लढण्याचे सामर्थ्य देणारे शिवचरित्र आज तरूणांना खूपच प्रेरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मातृ-पितृ भक्ती कशी होती हे शिवचरित्र आपल्याला शिकवते म्हणूनच व्यसनाधिनतेच्या आहारी जाणाऱ्या तरूणाईला तारायचे असेल शिवचरित्रातून हाच एकमेव पर्याय आहे असे सांगून त्यांनी मंडळाचे केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक केले.

यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,औदुंबर वाडदेकर,गौरीशंकर बुरकुल,प्रविण खवतोडे,गणेश पवार, अनिल इंगवले, गोपाळ भगरे, विजय बुरकूल यांचेसह सर्व माजी अध्यक्ष,रसिक श्रोते,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा विनायक कलुबर्मे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.