गाव चलो अभियानांतर्गत आ आवताडे हे शुक्रवारी भोसे येथे मुक्कामी

गाव चलो अभियानांतर्गत आ आवताडे हे शुक्रवारी भोसे येथे मुक्कामी

मंगळवेढा / प्रतिनिधी- 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे हे गाव चलो अभियानांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे शुक्रवारी मुक्कामी असणार आहेत. मोदी सरकार व महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणे तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे आदी कार्यक्रमांचे या अभियानामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियानामध्ये सर्वांशी संवाद साधता येणार आहे. तसेच मोदी की गॅरंटी हा नारा गावोगावी पोहोचविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये बुथ प्रमुखांशी बैठक, मतदार यादीतील लोकांशी चर्चा,  नागरिकांशी संवाद साधणे, नमो ॲप  बाबत प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटप करणे,  संघाच्या समविचारी मंडळींशी चर्चा, नमो चषक संदर्भात युवकांशी चर्चा करणे, सामाजिक संस्थांशी विचारविनिमय करणे, भिंती रंगवण्याचे काम करणे, बुथ कमिटी, बुथ कार्य समिती यांच्याशी चर्चा करून होऊ घातलेल्या सर्व प्रकारच्या निवडणुका संदर्भात नियोजन करणे. समाज माध्यमांच्या विविध मार्गाने भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे. अशा एकुणात्मक निर्णय कार्यक्रमांचा अवलंब करून आमदार समाधान आवताडे हे जनतेशी व कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.

प्रत्येक बूथवर पक्षाची संघटनात्मक बांधणी पूर्ण करण्याचे काम देखील या अभियानामध्ये पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर फिर एक बार मोदी सरकारचा नारा आणखी बुलंद केला जाणार आहे. सदर या अभियानामध्ये आमदार समाधान आवताडे भोसे येथे २४ तास मुक्कामी असणार आहेत. देशपातळीवर मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख निर्णयांची व कार्यक्रमांची पूर्तता झाली आहे. अगदी त्याचपद्धतीने राज्यात देखील महायुती सरकारच्या प्रयत्नातून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. या सर्व बाबींची जनतेसोबत चर्चा आणि माहिती झाली पाहिजे असा मुख्य उद्देश या अभियानाच्या पाठीमागे असल्याचे सांगण्यात आले आहे.

या गाव चलो अभियानामध्ये गाव-गट प्रमुख, बुथ प्रमुख, प्रवासी कार्यकर्ता, वॉरियर्स, सुपर वॉरियर्स यांना पक्षाने नेमून दिलेल्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टी अजेंडा पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.