पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश जगाचे नेतृत्व करेल - आ.आवताडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश जगाचे नेतृत्व करेल - आ.आवताडे

मंगळवेढा / प्रतिनिधी- 

भारत देशाला भाजपाचा विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मिळाल्याने अलीकडील दहा वर्षात देशाच्या विकासाचा व आर्थिक बाबींचा स्तर उंचावला असल्याचे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधाना आवताडे यांनी व्यक्त केले आहे. भारतीय जनता पार्टी गाव चलो अभियानांतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील बूथ प्रमुख, प्रवास कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स यांची कार्यशाळा मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली होती, त्या कार्यशाळेप्रसंगी आमदार आवताडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी हा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून सर्वसामान्य जनतेच्या पसंतीला उतरला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळामध्ये केंद्रात राबवल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच महायुती सरकारच्या काळामध्ये राज्यात निर्माण झालेल्या लोकाभिमुख योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून सरकार होत असलेल्या गाव चलो अभियानासाठी बुथ प्रमुख,  प्रवास कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स यांनी प्रत्येक गावातील जनतेपर्यंत पोहोचणे हीच या अभियानाचे मोठे फलित असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यशाळेप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीची जडणघडण याबद्दल माहिती सांगत असताना गाव चलो अभियानाची नेमकी दिशा आणि वाटचाल कोणत्या स्वरूपाची असावी त्यासाठी कोणते उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे याची सखोल माहिती उपस्थितांसमोर मांडली. आपल्या देशाला देशाच्या वैभवशाली उंचीवर पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आपण भक्कम करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आपण पक्षनिष्ठेला अनुसरून आपापली जबाबदारी नेटाने पार पडण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले आहे. सदर प्रसंगी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी सिद्धेश्वर कोकरे,  अनिल यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून ही अभियान गतिमान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिगंबर यादव यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून या अभियानाची नेमकी दिशा स्पष्ट केली.

या कार्यशाळेसाठी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, माजी संचालक सुरेश भाकरे, राजन पाटील, माजी नगरसेवक कैलास कोळी, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक शाम पवार, जेष्ठ नेते राजाराम कालिबाग, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, सरपंच सचिन चव्हाण, विवेक खिलारे, माजी सरपंच बिभिषण बेदरे, दत्तात्रय नवत्रे, नंदकुमार जाधव, गणेश गावकरे, माजी नगरसेवक खंडू खंदारे, युवा उद्योजक रविंद्र हेंबाडे,अध्यक्ष आनंदा मोरे,बादल सिंह ठाकुर, माजी उपसभापती रमेश भांजे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर काकणगी, नागेश डोंगरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे,  यांचेसह दोन्ही तालुक्यातील भाजपा प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, बुथ प्रमुख, प्रवास कार्यकर्ता, इतर कार्यकर्ते, व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी गावचलो अभियान विस्तारक रमेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.