भाजप युवा मोर्चा मंगळवेढा शहराध्यक्ष पदी सुशांत हजारे यांची निवड
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा शहर मंडल अध्यक्ष पदी सुशांत हजारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे . सदरील निवड जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे घोषित केली .
सुशांत हजारे यांनी यापूर्वी युवा मोर्चा शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते . पक्षाचे विविध कार्यक्रम , सामाजिक उपक्रम तसेच आंदोलन यामध्ये त्यांचा उस्फुर्त सहभाग असून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा या पदावर संधी देण्यात आली आहे . भाजप ने मंगळवेढा शहर हे नव्याने संघटनात्मक मंडल दर्जाचे केले आहे . यामुळे येत्या काळात मंगळवेढा शहराला संघटनात्मक ताकत मिळाली आहे . मंगळवेढा नगरपरिषद बाबत विविध आंदोलने करत आवाज उठवत सुशांत हजारे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केले आहेत .
या निवडीबद्दल आमदार समाधान आवताडे , भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण , जिल्हाध्यक्ष सूदर्शन यादव यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .