मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-
भारतीय जनता पार्टी जिल्हा वैद्यकीय सेल जिल्हा संयोजक पदी जेष्ठ आरोग्य तज्ञ डॉ.शरद शिर्के यांची निवड झाल्याबद्दल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या आदेशानुसार व भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये डाॅ.शिर्के यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सदर निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय आणि सामाजिक अशा दुहेरी सेवार्थ क्षेत्रात आपली कर्तव्य सेवा पार पाडणाऱ्या डाॅ.शिर्के यांच्या निवडीमुळे भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे जिल्हाभर भक्कम होतील असा विश्वास आमदार महोदय यांनी व्यक्त करून डाॅ.शिर्के यांना पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.सौ.प्रितीताई शिर्के मॅडम, न.पा.प्राथ.शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव,कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक जगन्नाथ रेवे,माजी नगरसेवक सचिन शिंदे सर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवराजषकोळी, धनंजय पवार,शहराध्यक्ष सुशांत हजारे, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नागेश डोंगरे, पोलीस भरती अकॅडमी संचालक श्रीकांत पवार सर, जिल्हा सचिव प्रथमेश बागल,धनाजी काशीद आदी मान्यवर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.