मंगळवेढा / सचिन हेंबाडे : -
भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी युवा समाजसेवक श्री.आदित्य मुदगुल-हिंदुस्तानी यांची निवड भारतीय जनता पार्टी चे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निवड झाल्याबद्दल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते व भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सदर निवडीचे पत्र देण्यात आले.
सामाजिक सेवेची आवड असलेल्या तळागाळातल्या लोकांना न्याय देणारे आदित्य हिंदुस्तानी यांनी आतापर्यंत विविध समाजपूरक कार्यक्रम राबून जनहिताचे कामे केलेली आहेत. त्यांच्या या विधायक कार्याची दखल घेत भाजपा कामगार आघाडी च्या जिल्हाध्यक्षपदी आदित्य हिंदुस्तानी यांची निवड करण्यात आल्याचे जाहिर केले.
सामाजिक अशा सेवार्थ क्षेत्रात आपली कर्तव्य सेवा पार पाडणाऱ्या या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे जिल्हाभर भक्कम होतील असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त करून पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देशसेवा कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष आहेत.कुशल नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवणारे आदित्य या पदास पूर्ण न्याय देतील असा विश्वास आहे.
जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नौकरदार, मंजुर, कामगारांच्या, कर्मचारी यांच्या समस्याना वाचा फोडण्यासाठी आपण कटिबद्ध असून केंद्र व राज्य सरकार यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार असल्याचे आदित्य हिंदूस्तानी यांनी सांगितले.
यावेळी डॉ.सौ.प्रितीताई शिर्के मॅडम, न.पा.प्राथ.शिक्षण मंडळ सदस्य श्री.दिगंबर मामा यादव, कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक श्री.जगन्नाथ आण्णा रेवे, माजी नगरसेवक श्री.सचिन शिंदे सर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुदर्शन यादव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.युवराज भाऊ कोळी, ग्रामविकास अधिकारी श्री.धनंजय पवार भाऊसाहेब, शहराध्यक्ष श्री.सुशांत हजारे, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री.नागेश डोंगरे, पोलीस भरती अकॅडमी संचालक श्री.श्रीकांत पवार सर, जिल्हा सचिव श्री.प्रथमेश बागल, श्री.धनाजी काशीद आदी मान्यवर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.