
मारापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच मा.श्री.विनायकराव यादव यांना "राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार"
राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराचे वितरण रविवारी 11 फेब्रुवारी रोजी होनार...
मंगळवेढा /सचिन हेंबाडे :-
ग्रामपंचायत मारापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच तथा महाराष्ट्र राज्य,सरपंच सेवा संघ तालुकाध्यक्ष मा.श्री.विनायकराव यादव साहेब यांना "राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार-२०२४" या सन्मान जाहीर झाल्याबद्दल साहेबांचे त्रिवार अभिनंदन व मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

सरपंच पद हे शोभेचे अथवा सार्वजनिक प्रतिष्ठेचे माध्यम नसून ते गाव-खेड्यातील सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे तसेच धोरणात्मक परिवर्तनाचे सेवादूत केंद्र आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो हात दूर असणाऱ्या गाव पातळीवरील माय-बाप जनतेच्या व्यथा आणि अवस्था जाणून त्यावर आपले जेष्ठ मार्गदर्शक आमदार महोदय मा.श्री.समाधान दादा आवताडे साहेब यांच्या माध्यमातून सेवापीठ निर्माण करणारा आपला सरपंच म्हणून श्री.यादव साहेबांनी अल्प काळामध्ये आपली प्रतिमा निर्माण केली आहे. मारापूर गावचे सरपंच म्हणून तब्बल ३० वर्षे लोकविचारांची कावड आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणाऱ्या आदरणीय श्री.माधवराव उर्फ दादासाहेब यादव यांच्या पुण्यकार्य साधनेच्या रूपाने यादव परिवाराने जिल्ह्यातील राजकीय, व्यावसायिक, सामाजिक व शासकीय सेवार्थ आपला राबता कायम ठेवला आहे.
या भागातील गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर, बेरोजगार यांनी पाठीशी उभ्या केलेल्या जनमताच्या आधारे आदरणीय वहिनी सौ.रोहिणीताई विनायकराव यादव यांनीही सरपंच म्हणून एक दिमाखदार टर्म जनसेवेसाठी खर्ची घातली आहे. सर्वसमावेशक समाजकारण आणि सलोख्याचे राजकारण करणाऱ्या या कर्तबगार सरपंच महोदयांना राज्य पातळीवरील नियोजन पुरस्काराने सन्मानीत होण्याचा सुवर्ण योग घडून येतो आहे याचा मनस्वी आनंद आणि बक्कळ समाधान या भागातील जनतेच्या मनावर कोरले जात आहे.