मंगळवेढा येथे शरद पवार गटाकडून माता रमाई यांना जयंती निमित्त अभिवादन

मंगळवेढा येथे शरद पवार गटाकडून माता रमाई यांना जयंती निमित्त अभिवादन
मंगळवेढा / सचिन हेंबाडे : -

आज दि. ७ फेब्रुवारी २४ मंगळवेढा येथे मा. शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे जिल्ह्याचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील कार्यलयात माता रमाई यांची जयंती माता रमाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व बुध्द वंदना घेवून साजरी करण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सहसचिव मा. विजयकुमार खावतोडे यांनी माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक, शैक्षणिककार्याला मोठे पाठबळ दिले. अत्यंत गरिबीत ही समाधानाने व संयमाने संसार कुटूंब सांभाळून बाबासाहेब यांचे धर्य वाढवले. बाबासाहेबांच्या नोकरीत अडथळा येणार नाही, त्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही यांची नेहमीच काळजी घेतली. बाबासाहेबांच्या प्रयत्नाने माता रमाई लिह्याला वाचायला शिकल्या होत्या. असे मनोगत व्यक्त केले.

तसेच सामाजिक न्याय विभाग ता. अध्यक्ष बबन ढावरे यांनी यांच्या पत्नी हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी बबन ढावरे यांनी माता रमाई या धर्मनिष्ठ भगिनी होत्या असे गौरोउदगार काढले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभा कार्याध्यक्ष मुझमील काझी यांनी केले तर आभार ता. उपाध्यक्ष संतोष रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास शहर अध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, सामाजिक न्याय विभागाचे ज्ञानेश्वर भंडगे, पप्पू भोसले, विनोद अवघडे, विक्रम साखरे, विजय कुचेकर, श्रीरंग माळी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.