मंगळवेढा येथील श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर - अध्यक्ष अशोक कोळी

मंगळवेढा येथील श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर - अध्यक्ष अशोक कोळी 

या मंदिराविषयी आपण थोडेसे जाणून घेऊ ...

मंगळवेढा /सचिन हेंबाडे:-

श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर हे कोणत्याही पूर्व नियोजित नकाशाप्रमाणे बांधले गेले नाही, या बांधकामासाठी जसा जसा निधी मिळत गेला तसतसे या मंदिराचे शिल्पकार श्री मोहनलाल फुलचंद सोमपुरा, रा.मुंडारा (राजस्थान) यांनी श्री रिद्धी सिद्धी महागणपतीनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे विधीविधान पूर्वक शास्त्रोक्त पद्धतीनेच वास्तु शास्त्रानुसार राजस्थान येथील मकराना येथील कुंभारी जातीच्या पाषाणात "नागरशैली" या वास्तुकलेनुसार बांधले आहे. या पाषाणात (मार्बल) बांधलेल्या मंदिराच्या आयुष्यमान सुमारे 1000 वर्षे इतके असते.
*मंदिराची संकल्पना :-*

एकदा श्री रिद्धी सिद्धी महागणपतीजीना आपले आई-वडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्याची इच्छा झाली. त्यावेळी त्यांनी 164 गजराज असलेल्या व 90 खांबावर उभारलेल्या रथावर आरूढ होऊन ते निघाले हे पाहून इंद्रदेवाने आपले कडून त्यांची सेवा घडावी म्हणून 102 "देवनर्तिकांना" या रथ सोहळ्यात नृत्यगायनासाठी सहभागी होणेस सांगितले. त्याप्रमाणे त्या सर्व देवनर्तिकां या मिरवणुकीमध्ये नाच गात सहभागी झाल्या. हे पाहून श्री गणपतीचे प्रिय वाहन "मूषकराज" यांनी आपल्या १०६ मूषक सवंगड्यांनाही आदेश दिला. तुम्ही सर्वांनी या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगलवाद्य वाजवीत, गायन करत या मिरवणुकीत सामील व्हा. त्याप्रमाणे ते या मिरवणुकीत सामील झाले. तसेच मुषकराजांनी या मिरवणुकीत दिमतीला 12 घोडे,12 उंच,4 मोर या सर्वांच्या सहभागी केले, त्यामुळे या मिरवणुकीला आणखी शोभा आली. ही मिरवणूक शिवपार्वतींच्या महालासमोर आली असता "श्री महागणपतींच्या" स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सूर्यमूषक व चंद्रमुषक उभे राहून त्यांचे स्वागत केले. अशी ही मंदिराची संकल्पना आहे. त्याप्रमाणे शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केले आहे.

*मंदिराचे वैशिष्ट्ये :-*

मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री रिद्धी सिद्धी महागणपतीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आतील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या 23 ओवऱ्या (छोटी मंदिरे)व बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या 21 ओवऱ्या (छोटी मंदिरे) यामध्ये देवी देवतांच्या व सर्व जाती धर्मातील साधू संतांच्या 55 मूर्ती व श्री रिद्धी सिद्धी महागणपतीची मूर्ती अशा एकूण 56 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा विक्रम सवंत 2080 माघ शुल्क वसंतपंचमी बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी अभिजीत शुभ मुहूर्तावर विधिवत पद्धतीने वेदशास्त्र संपन्न गुरुजनांकडून झाली आहे. श्री महागणपती ची मूर्ती जयपूर येथील मूर्तिकार आणि उच्च जातीच्या अखंड पाषाणात (मार्बल)रिद्धी सिद्धी सह बनवलेली मूर्ती आहे.

या मंदिराचे बांधकाम करताना शिल्पकाराने सूर्योदय सूर्यास्त याचे योग्य नियोजन करूनच या मंदिराची रचना केली आहे.सदरचे मंदिर हे पश्चिमाभिमुख असल्याने या मंदिरातील श्री रिद्धी सिद्धी महागणपतीच्या मूर्तीवर सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत मूर्तीला उजळून टाकतात त्यावेळी गाभाऱ्यामध्ये रोषणाई आल्याचे दिसते.

मंदिरात बाहेरील प्रांगणामध्ये दोन अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ व दोन तुळशीवृंदावन आहेत त्यांची माहिती अशी आहे. अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभावर हिंदू धर्मशास्त्रातील अष्ट शुभचिन्हे(ओम ,श्री ,स्वस्तिक ,त्रिशूल ,कमख ,दीप ,मंगलकलश) ही कोरलेली आहेत. तसेच तुळशी वृंदावनामध्ये राम तुळस वृंदावन म्हणजेच हिरव्या पानांची तुळस व शाम तुळस वृंदावन म्हणजेच लाल कळसकर रंगाच्या पानांची तुळस आहे.

अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ व तुळशी वृंदावनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की एका वर्षातील 11 संकष्टीला प्रत्येक संकष्टीला 11 प्रदक्षणा अष्टसिद्धी मंगल स्तंभ व तुळशीवृंदावनास घातल्यास त्या भक्तास त्याची इच्छा फलप्राप्ती होते असे गणेश पुरानात सांगितले आहे तसे भक्तास अनुभव आले आहेत.

*मंदिराची निर्मिती :-*

या मंदिराची निर्मिती सण 1983 ते 2024 या 41 वर्षाच्या कालखंडात कै.श्रीमती काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सूनबाई कै. श्रीमती पारूबाई भगवान कोळी यांनी सुरू केलेल्या मंदिराच्या बांधकामाची सांगता पुढे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री अशोक भगवान कोळी , सौ लता अशोक कोळी व कोळी परिवार तसेच सर्व ज्ञात अज्ञात गणेश भक्तांच्या सहभागातून व सहकार्यातून हे मंदिर साकारलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.