मारापुर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

मारापुर येथे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढा / प्रतिनिधी :-

 मंगळवेढा तालुक्यातील मारापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केलेले लोकनियुक्त सरपंच विनायक  यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मारापुर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन उद्या शुक्रवार दि. 1 मार्च 2024 रोजी करण्यात आले आहे.
सकाळी 8:00वाजता शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम शुभहस्ते तंटामुक्त अध्यक्ष भगवान आण्णा आसबे यांच्या शुभहस्ते होणार आहे ,सकाळी 9:00 वाजता सरपंच चषक 2024 (भव्य हाफ पीच क्रिकेट सामने) उद्घाटक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सोमनाथ विष्णुपंत आवताडे यांच्या शुभहस्ते होणार आहे,सकाळी 10:00 वाजता सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिर उद्घाटक आवताडे शुगर चेअरमन संजय महादेव आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे,सकाळी 10:30 वाजता मोफत अन्नदान मूकबधिर शाळा, मंगळवेढा व मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह,लवंगी येथे करण्यात येणार आहे ,सायंकाळी 7:00 वाजता भव्य नागरी सत्कार समारंभ शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
     
 तरी सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील  जास्तीत जास्त नागरिकांनी या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक सरपंच विनायक यादव मित्रपरिवार मारापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.