उजनीचे असमान पाणी वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, आ आवताडेंची पालकमंत्र्यासमोर मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली

उजनीचे असमान पाणी वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, आ आवताडेंची पालकमंत्र्यासमोर मागणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली 

आजपासून उजनीत पाणी सुटणार बैठकीत निर्णय

मंगळवेढा/सचिन हेंबाडे:-

उजनीत 67 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता,उजव्या कालव्यातून एकाच पाळीचे पाणी मिळाले,सर्वजण पाणी कमी मिळाले म्हणत आहेत मग उजनीतील पाणी गेलं कुठं? असा सवाल करत आमदार समाधान आवताडे यांनी पाणी वाटपात अनियमित्ता झाली असून काही भागात तीन-तीन पाळ्या पाणी दिले आहे तर काही भागात अपुरे व कमी पाणी दिले असून अधिकारी 'एकाला तुपाशी व एकाला उपाशी' ठेवत असल्याचा आरोप करत पाणी वाटपात अनियमितता करणाऱ्या अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
यावेळी आ आवताडे यांनी आक्रमकपणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर उजनीच्या पाणी वाटपात अनियमित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले उजनीतील ६७ टक्के पाणीसाठा तसेच ५ टक्के खरीपातील भीमा सीना जोड कालव्याचा आणि सीना माढा उपसा सिंचनचा तसेच पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात आलेले १५ टक्के पाणीसाठा असे एकूण ८७ टक्के पाणी उपलब्ध असूनही
मतदारसंघातील भागासाठी ५पैकी १च आवर्तण मिळाले असल्याची माहिती देत बाकीच्या भागात खरीप व रब्बी हंगामात ३आवर्तण झाले असून या असमतोल पाणी वितरणाबाबत प्रश्न उपस्थित करत कालवा सल्लागार समितीच्या विना परवानगी ने झालेल्या या अयोग्य आणि अनियोजित तसेच विनापरवाना पाणी वाटपाची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी आ आवताडे यांनी आक्रमकपणे केली त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी झालेल्या अनियोजित व अयोग्य वाटप झालेल्या पाणी वितरणाबाबत चौकशी समिती नेमून याची चौकशी करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली तसेच मतदारसंघातील भागाकरिता त्वरित एक आवर्तणाची गरज असून ते तात्काळ वितरित करावे तशा सुचना संबंधित खात्यास मिळावी ही विनंती आवताडेंनी केल्यानंतर तात्काळ आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या.

 या बैठकीस आमदार समाधान आवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,आ.संजय मामा शिंदे,आ.यशवंत माने ,आ.राजेंद्र राऊत, .रणजित शिंदे, कल्याण काळे तसेच सोलापूर जिल्हाधिकारी श्री.कुमार आशिर्वाद व जिल्ह्यातील विविध तालुक्याचे लोकप्रतिनिधी,अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.