आवताडे शुगरमधील वजन काट्याच्या विश्वासार्हतेवर वैधमापन विभागाकडून शिक्कामोर्तब

आवताडे शुगरमधील वजन काट्याच्या विश्वासार्हतेवर वैधमापन विभागाकडून शिक्कामोर्तब

मंगळवेढा/ सचिन हेंबाडे :-

सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू असून कारखान्यावरील वजन काट्यांची तपासणी भरारी पथकाकडून सुरू आहे साखर आयुक्त यांचे आदेशानुसार भरारी पथकाने शनिवारी आवताडे शुगरवर अचानक धाड टाकून वजन काटयाची तपासणी केली. या वैधमापन तपासणी पथकामध्ये वैधमापन शास्त्र सोलापुरचे उपनियंत्रक ए.डी. गेटमे व निरीक्षिक एम.आर. कांबळे, शेतकरी प्रतिनिधी उमेश भोसले आदिनी तपासनी करून वजन काटा तंतोतंत असल्याचा लेखी अहवाल दिला. यावेळी, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, सरवव्यस्थापक (टेक्नि.) सुहास शिनगारे, प्रताप मोरे, सुधाकर पाटील, मनोज होलम अदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन संजय अवताडे म्हणाले की आवताडे शुगरचे मार्गदर्शक आमदार समाधानदादा आवताडे यांचा मार्गदर्शनानुसार  शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत गेल्या २ वर्षापासुन कारखान्याचा कारभार हा पारदर्शक पणे चालवीत आहोत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सिमेवर उभारण्यात आलेल्या या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विश्वासार्हता जपलेली असल्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. त्यातच वैधमापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहवालामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासार्हतेत आणखी भर पडली आहे  कारखान्याने चालु गळीत हंगामात ५ लाख मे. टनाचे उदिष्ट ठेवलेले असुन पुर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. तालुक्यातील कोणत्या हि शेतकयांचा ऊस शिल्लक न ठेवता संपुर्ण पणे गाळप करणार असल्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.