बोराळे मध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
(खेळ पैठणीचा कार्यक्रमात जल्लोष, आनंद यांच्यासह आनंदाश्रु - वाचा काय घडले?)
मंगळवेढा /प्रतिनिधी -
दि.१४जानेवारी रोजी सायंकाळी ६वा. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बोराळे, ता.मंगळवेढा येथे "खेळ पैठणीचा" कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनिंच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला. पण चर्चा रंगली ती राखी पौर्णिमेची...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांचे सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू असतात. सध्या मंगळवेढा तालुक्यातील वेगवेगळ्या गावात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये विविध खेळ सुरू असतानाच एका महिलेने एक अपेक्षा व्यक्त केली - आबांना राखी बांधण्याची.
त्या महिलेचा भाऊ आहे, पण राखी बांधून घेत नाही. त्यामुळे त्यांची अनेक वर्षांची इच्छा अपुरी राहिली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आबांना राखी बांधून अनेक वर्षांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ती इच्छा अभिजीत पाटील यांनी तत्काळ पूर्ण करत सख्ख्या बहिणीप्रमाणे एक भाऊ म्हणून कर्तव्य पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अभिजीत पाटील यांच्या या एका कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.
खेळ पैठणीचा या उपक्रमाच्या माध्यमातून असंख्य महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. शेकडो महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. या सर्व खेळांमध्ये पहिल्या विजेत्या सौ.प्राजक्ता ताई क्षीरसागर, दुसऱ्या विजेत्या सौ.वैशाली ताई मुंगसे, तिसऱ्या विजेत्या सौ.अंजली ताई डोंबे तर चौथ्या विजेत्या सौ.सुवर्णा ताई ठेंगील या ठरल्या. सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध निवेदिका, मोनिका जाजू यांनी केले. त्यांच्या संयोजनाने शेकडो महिलांना अक्षरशः खिळवून ठेवले.
याप्रसंगी श्री.नागेश पिंटू पाटील, मा.सरपंच सचिन नकाते, चैतन्य पाटील, महेश पाटील, अमोल म्हमाने, दिलीप धनवे, राहुल पाटील मुंडेवाडी, महासिद्ध कोळी समाज सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष शिल्पाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनवे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य घोडके मॅडम, जयश्री कवचाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिक गुंगे, कट्टे सर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे यांसह बोराळे गावातील ग्रामस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.