मंगळवेढा (सचिन हेंबाडे) :-
इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले जातात.स्व.कदम गुरुजी यांचे कष्ट आणि प्रामाणिक शिक्षकांमुळे इंग्लिश स्कूल मंगळवेढा शाळा नावारूपाला आली.असे मत माजी सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी व्यक्त केले.इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मंगळवेढा, दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, तसेच शिवतेज प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार मदन जाधव,सचिवा प्रियदर्शनी महाडिक,उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम,संस्थेच्या ऍडमिनिस्ट्रेटर डाॅ.मीनाक्षी कदम,संचालिका तेजस्विनी कदम,खजिनदार राम नेहरवे, प्राचार्य रवींद्र काशीद, ज्योती कांबळे आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दलित मित्र स्व. कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दीपक आर्वे म्हणाले की,स्नेहसंमेलन हा विद्यार्थाचा आनंद मेळा असतो,यातच विद्यार्थ्यांना कलागुण व्यक्त करण्याची संधी मिळत असते.यामुळे आपल्यालाही आपल्या शालेय जीवनातील आठवणी जागा करतात, स्नेहसंमेलनातील कलागुणामुळे विद्यार्थीना राज्यात व देशात चमकण्याची संधी मिळते.
यावेळी बोलताना तहसीलदार मदन जाधव म्हणाले की, विद्यार्थाच्या विकासासाठी इंग्लिश स्कूलमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मलाही माझ्या शालेय जीवनाच्या आठवणी जाग्या झाल्या,इंग्लिश स्कूलमध्ये राबवणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाला उपस्थित राहिल्याने मी या शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षक असायला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
या स्नेहसंमेलनामध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.गणेश वंदना, शेतकरी गीत,मंगळागौर, रावडी , कोळी नृत्य,वाघ्या मुरळी, देशभक्तीपर गीत, गोंधळी गीत, लावणी, पोवाडा, महाभारत,शंकर पार्वती, तांडव नृत्य, शिवराज्याभिषेक यासह अनेक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थित पालकांची वाहवा मिळवली, सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवानंतर या मैदानावर पुन्हा एकदा तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला.
यावेळी उपमुख्याध्यापक सुनील नागने,पर्यवेक्षक दिलीप चंदनशिवे, सुहास माने, चांगदेव जाधव,माऊली कौडूभैरी, माध्यमिक कार्याध्यक्षा के.एस.जोशी उच्च माध्यमिक कार्याध्यक्ष मनोजकुमार अवधुत, शिवतेज प्राथमिक कार्याध्यक्ष सचिन ढगे ,शिक्षकेतर कार्याध्यक्ष बालाजी गायकवाड ,माध्यमिक जी.एस राज घाडगे,माध्यमिक एल.आर आश्लेषा भोसले, उच्च माध्यमिक जी.एस विशाल सपताळे, उच्च माध्यमिक एल.आर अंजली टिक्के ,महाविद्यालय यु.आर आवेश बनसोडे ,महाविद्यालय एल. आर अमृता नाईकवाडी,फार्मसी यु आर रोहन जगदाळे, फार्मसी यू आर प्राप्ती कदम आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन गोरिमा शेख व विद्या रामगडे यांनी केले तर आभार बालाजी शिंदे यांनी
......
चौकट:-
यासाठी नृत्याविष्कारासाठी संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी महाडिक यांनी मार्गदर्शन केले.
सलग दीड महिना सराव करून बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.हा कार्यक्रम के डी डान्स स्टुडिओ यांनी बसवले होते.यासाठी के डी ऊर्फ किरण देठे, अनिरुद्ध देवडीकर, प्राजक्ता लोखंडे, साक्षी भागा नगरे ,गायत्री जाधव, किरण जाधव, विशाल सांडगे, अनिकेत बंद पट्टे,विशाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.