ढवळस येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

ढवळस येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

मंगळवेढा (प्रतिनिधी):-
                  स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, शोषितांचा- पददलितांचा बुलंद आवाज " साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे " यांच्या जयंती पूर्वसंध्येला ढवळस येथे आयोजित मूर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच मा.शिवाजी आप्पा हेंबाडे यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

आपल्या विचारांमधून आणि अमूल्य कार्यातून लोककलेस उच्च प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे विधायक व्यक्तिमत्व म्हणजे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे आपणांस आदर्श आहेत. समाजातील वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे विचार खूप व्यापक आणि प्रेरणादायी असल्याचे मनोगत माजी सरपंच मा.शिवाजी आप्पा हेंबाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच मा. शिवाजी हेंबाडे, उद्योजक मा. रवींद्र हेंबाडे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष मा.आनंदा मोरे,भारिप बहुजन तालुकाध्यक्ष मा.अशोक माने,मा. औदुंबर हेंबाडे, ग्रा.पं.सदस्य मा.नवनाथ मस्के,मा.कुंडलिक गायकवाड,मा.महादेव गायकवाड, मा.प्रकाश गायकवाड,मा. तुळशीराम गायकवाड,मा.तुकाराम मस्के,मा.सुनील मस्के,मा.संभाजी मस्के,मा.अमोल गायकवाड,मा.भाऊसो एकमल्ले, मा.तात्या मस्के,मा. अनिल मस्के,मा. लक्ष्मण मस्के,आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.