नोकरीची सुवर्ण संधी! 10वी,12वी उत्तीर्ण धारकांना मोठ्या कंपनीत नोकरीची संधी, मंगळवेढ्यात विविध पदासाठी होणार मोठी भरती
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक जण उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. आशा तरुणांसाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड,मंगळवेढा यांनी उपलब्ध करून दिली आहे.
मंगळवेढा शहरापासून दामाजी साखर कारखाना रोड येथे असणाऱ्या आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड,मंगळवेढा या कंपनीत विविध पदासाठी भरती होणार आहे.यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
आवताडे स्पिनर्सच्या सुरक्षा विभागात खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत.तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडाटा, शैक्षणिक आहर्ता,पूर्वानुभव यांचे छायांकित प्रमाणपत्र व पगाराच्या अपेक्षासह अर्ज दिनांक 20- 04- 2022 पर्यंत या कार्यालयास पोहोचतील असे पाठवावे,अथवा hr.aspl@autadegroup.com या ई-मेल वर पाठवावेत.
1)सुरक्षा विभाग खाते प्रमुख :-
सुरक्षा विभाग खाते प्रमुख या पदासाठी पद संख्या - 1,शिक्षण -12 वी पास ,भारतीय सैन्यदलात कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
2)सुरक्षा रक्षक :-
सुरक्षा रक्षक या पदासाठी पद संख्या -18,शिक्षण 10 वी पास , सुरक्षा रक्षक म्हणून 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
वरील सर्व पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरित आपले अर्ज करून आवताडे स्पिनर्स येथे समक्ष येऊन भेटावे.