भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा शहर कार्यकारिणी घोषित

भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा शहर कार्यकारिणी घोषित 

मंगळवेढा (प्रतिनिधी):-

              भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची शहर कार्यकारणी आज घोषित करण्यात आली . भाजप सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव , दिगंबर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली . 
              युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी,  युवा मोर्चा तर्फे येत्या काळात मंगळवेढा शहरात चांगल्या पद्धतीच काम उभारण्याकरता भर दिला जाईल . युवा वॉरियर सारखा कार्यक्रम देखील मोठया पद्धतीने पार पाडू असे मत प्रास्ताविक त्यांनी केले . 
              त्यानंतर जिल्हा संघटन सरचिटणीस यांनी सर्वाना प्रमुख मार्गदर्शन केले . यावेळी बोलताना ते म्हणाले , " भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे , प्रत्येक  सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कार्य करण्याची संधी दिली जाते आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्ह्याचा प्रमुख जबाबदारी निभावत आहे हे फक्त भारतीय जनता पार्टी मध्येच होऊ शकतं  भाजप मध्ये काम करणाऱ्यांना संधी दिली जाते गरीब-श्रीमंत कोणताही भेदभाव न करता प्रत्येक समाजातील घटकातील कार्यकर्ता हा राष्ट्रीय स्तरापर्यंत चा नेता होऊ शकतो आज इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता उद्या नेतृत्वाची भूमिका बजावू शकतो काम करून दाखवण्याची इच्छाशक्ती प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे त्यामुळे येत्या काळात मंगळवेढा शहरामध्ये आंदोलनात्मक भूमिका असेल कार्यक्रमात मग भूमिका असेल प्रत्येक स्तरावरचा कार्यकर्ता सामावून घेऊन काम केले पाहिजे आणि मंगळवेढा शहरामध्ये भाजपची ताकद जोमाने वाढवली पाहिजे . " अश्या पद्धतीचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले . यावेळी मा.दिगंबर यादव यांनी देखील सर्वाना मार्गदर्शन केले . 

      
        मंगळवेढा शहर कार्यकारणी :-
शहर अध्यक्ष - सुशांत हजारे , शहर सरचिटणीस - अजित लेंडवे , शहर सरचिटणीस - ओंकार म्हेत्रे , उपाध्यक्ष - रोहित हिरेमठ , उपाध्यक्ष - सुजित निकम , उपाध्यक्ष - ज्ञानेश्वर काशीद , सचिव - अविनाश मेटकरी , सचिव - फरीद दरवाजकार , सचिव - संकेत लांडे , सचिव - विश्वास मोहिते , सचिव - गणेश चोखंडे , सचिव - बापूसाहेब उन्हाळे , सचिव - प्रतीक ठोंबरे , सचिव - पांडुरंग दिवसे , सदस्य - रवी आवताडे , विनोद वेदपाठक , सुदेश शिंदे , अनिकेत नाझरकर , हृषीकेश क्षीरसागर , निलेश जोशी 
    
           निवड कार्यक्रमाचे समारोप सुशांत हजारे यांनी केला .
भाजपचे आनंद माने , उमेश विभूते , महेश हजारे , आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.