मंगळवेढा (प्रतिनिधी):-
डाळींब उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक ७ आँक्टोंबर २०२१ पासुन मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये डाळींब सौदे लिलाव दररोज सुरु होणार असलेची माहिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.
कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहात सर्व डाळींब आडत व्यापारी व शेतकरी यांची बैठक घेणेत आली सदरच्या बैठकीमध्ये डाळींब सौदे लिलावबाबत सर्वानुमते निर्णय घेणेत आला. बाजार समिती संचालक मंडळाने शेतक-यांचा हितासाठी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. बाजार समितीने डाळींब सौदे लिलाव सुरु केलेपासुन २० कोटींची उलाढाल झाली असुन २१ हजार शेतकर्यांनी आपले डांळीब सौदे लिलावात विक्री केलेली आहे .
डाळींब सौदे लिलावाच्या ठिकाणी राञीच्या वेळी शेतकरी डाळींब घेउन येतात त्यांना पुरेशा प्रमाणात प्रकाश मिळावा यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करुन दोन नवीन हायमास्ट दिवे मंजुर करणेत आलेले आहेत. पुढील ४ दिवसामध्ये ते बसविणेत येणार आहेत. डाळींब सौदे लिलाव हे दररोज दुपारी ४ वाजता सुरू होतील तसेच प्रत्येक आठवड्यातील दर रविवारी सौदे लिलावस साप्ताहिक सुट्टी राहील अशी माहिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.