मंगळवेढा (प्रतिनिधी):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय सोनई येथून आलेल्या कृषीदूत आदित्य शांतीलाल काटकर यांनी ढवळस (ता. मंगळवेढा)येथे माती परीक्षणाबद्दल जनजागृती केली.
यावेळी प्राचार्य डॉ. मोरे सर, प्रा. कडू सर, प्रा. गाडेकर सर यांच्या मार्गदर्शनासुर आदित्य काटकर यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवले.माती परिक्षणाचा मूळ उद्देश हा जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे तपासणे व ती कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.
कृषिदुत आदित्य काटकर
कृषी महाविद्यालय सोनईच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदुतांनी मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणत्या ठिकाणी घ्यावा, कोणत्या ठिकाणी घेऊ नये तसेच मातीची उत्पादकता कशी वाढवावी, आवश्यक अन्नद्रव्ये कोणती व त्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रगशिल बागायतदार प्रदीप हेंबाडे,महेश हेंबाडे, बाळू बावचे, संजय आगलावे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.