कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा येथे टोमॅटोला प्रति कॅरेट 1011रू उच्चांकी दर - सभापती सोमनाथ आवताडे
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक 15/08 रोजी बीराप्पा बंडगर या शेतकऱ्याने विक्रीसाठी 50 कॅरेट टोमॅटो मोहन शंकर माळी यांच्या कडे विक्रीसाठी आणले होते तर निलावा मध्ये या शेतकऱ्यांच्या टोमॅटोला 1011रू उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
सदर शेतकऱ्याने आनंदी होऊन आडत व्यापारी मोहन शंकर माळी यांचा फेटा बांधून सत्कार केला.
यावेळी आडत व्यापारी अनिल बोदाडे(मेंबर), अण्णा बोदाडे, अविनाश चेळेकर, ओंकार भोसले, बिलाल बागवान, राहुल माने, सोमनाथ बनसोडे, नाना काळे आदी उपस्थित होते.