मंगळवेढा(प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगावं येथे वंचित बहुजन आघाडीची शाखेचे उद्घघाटन तालुक्याचे अध्यक्ष अशोक माने यांचे हस्ते करण्यात आले.तसेच समता प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे ऊद्घघाटन जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांचे हस्ते करण्यात आले दोन्ही कार्यक्रम एका ठिकाणी करण्यात आले वंचितचा आवाज निर्माण करण्याचे काम तालुक्यात शाखा ऊद्घघाटनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
गुंजेगाव शाखेचे पदाधिकारी यांना भावी कार्यास शुभेच्छा अशोक माने यांनी देऊन वंचित बहुजन आघाडी हीलोक चलवल असून लोकांना जागृती करण्याचे काम आमचा पक्ष करत असून लोकांना संवैधानिक अधिकार मिळाले पाहिजेत असे आपले भाषणात अशोक माने यांनी सांगितले या प्रसंगी ता प्रवक्ते प्रा महादेव ढोणे सर म्हणाले की भाजपने 1984साली 545 जागा लढवून 2 जागा जिंकून 0.36 ℅ मते मिळाली आणि वंचितने 24जागा लढवून 2.08 ℅ मते मिळाले याचाच अर्थ प्रत्येक पक्षाची वाढ ही हळुहळू होत असते पण 1984 सालाप्रमाने भाजप पक्षाला जेवढी मते मिळाली, त्या हिशोबाने वंचितला गेल्या लोकसभेला जास्त मते मिळाली असून या पुढिल काळात वंचित बहुजन आघाडी चांगले यश मिळवू शकते तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुका वंचित स्वबळावर लढणार असल्याने वंचित समुहाने वंचित बहुजन आघाडी च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ द्यावी असे आवाहन प्रा महादेव ढोणे सरांनी केले आहे. त्याचबरोबर बिरा मोटे सरांनी वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त करुन सर्वच पक्षात साटेलोटे व घराणेशाही आहे अशा प्रस्थापित पक्षाला गाडण्यासाठी वंचित च्या पाठी उभे राहावे असे मोटे सरांनीही आवाहन केले त्याचबरोबर तुकाराम काळुंखे सूब्राव काळुंखे यांनी वंचित च्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार करून सांगितले तसेच शंकर चौघुले, बाळासाहेब ढोणे यांनी मत व्यक्त केले यावेळी जि.प व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे जिल्हा संघटक वैभव भंडारे ,पंढरपूर ता. अध्यक्ष विकास गायकवाड उपाध्यक्ष संजय सरोदे, ता. सचिव अनंता वाघमारे व अर्जुन शिवशरण भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल सरवदे सतिश लोकरे गौतम लोकरे ,भाऊसाहेब व्हनवटे सल्लागार मा.तुकाराम काळुंखे प्रसिद्ध प्रमुख माननीय श्री निवास गंगणे युवा नेते अंकुश मिटकरी गुंजेगाव तालुका तंटामुक्त अध्यक्ष बालाजी मिटकरी शाखा अध्यक्ष भारत माने सचिव संतोष लंगोटे कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे खजिनदार ज्ञानेश्वर संघटक ज्ञानेश्वर गणेश कुंभार सदस्य दीपक बोरुडे सुरज काळुंखे शंकर(बापू) चौगुले दत्तात्रेय ( पप्पू) पाटील रामचंद्र काळुंखे मंगळवेढा व पंढरपूर येथील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आठवले सर यांनी केले आभार प्रदर्शन मा. श्रीनिवास गंगणे यांनी केले.
पत्रकार
सचिन हेंबाडे
मो.नं.9637545262
8668236467