जिल्हा परिषदेच्या ढवळस शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक टीमचा "एक पणती गावासाठी,दोन पणत्या मांगल्यासाठी" उपक्रम साजरा

जिल्हा परिषदेच्या ढवळस शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक टीमचा "एक पणती गावासाठी,दोन पणत्या मांगल्यासाठी" उपक्रम साजरा

मंगळवेढा(प्रतिनिधी):-
         जिल्हा परिषदेच्या ढवळस शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक टीमने 'एक पणती गावासाठी' "दोन पणत्या मांगल्यासाठी,आपल्या लेकराच्या भविष्यासाठी" व  'एक दिवा मानवतेचरणी' हा नवोपक्रम विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्यात समन्वय असावा.कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक पालक सुसंवाद व्हावा.यासाठी
"एकच ध्यास,गुणवत्ता विकास." " माझा विद्यार्थी,माझी जबाबदारी" या प्रेरणेने  राबविला.विद्यार्थ्यांच्या या कल्पकता व सर्जनशीलतेला दाद व प्रतिसाद देणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे.सर्वानी "माझी ढवळस शाळा" या भावनेने दोन तीन दिवसात मुलांनी केलेल्या या नवीन उपक्रमाला भेट द्यावी.असे आवाहन उपक्रमाचे संयोजक  विजयसिंह गायकवाड व मुख्याध्यापक सुर्यकांत जाधव यांनी केले.
          शाळेने राबवलेला नाविन्यपूर्ण "एक पणती गावासाठी" उपक्रमास न्यायाधीश मा. नडगदल्ली साहेब व त्यांचे सहकारी वकील टीम.तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लवटे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.पांढरे,केंद्रप्रमुख पी.जी.राठोड,सरपंच प्रा.सिध्देश्वर मोरे, माजी केंद्रप्रमुख शामराव मोरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती गायकवाड,ग्रा.पं.सदस्या प्रा.आश्विनी गायकवाड,सुधामती मोरे,महाजन सर,राधिका हेंबाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंपूशेठ मोरे,मंगेश मोरे,सहशिक्षिका पोरे,आबासो गायकवाड प्रकाश गायकवाड,विजय कुंभार,रायबान गुरूजी ,पत्रकार सचिन हेंबाडे,बंडू पाटील अनेक पालक,ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी नागरिकांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.
    
       "एक पणती...गावासाठी"या उपक्रमात 
विद्यार्थ्यानी कार्यशाळेत रंगकाम केलेल्या पणत्या गावात शोभायात्रा काढून घरोघरी पोहचवल्या.
      काही घरी अतिशय भावनिक   वातावरण निर्माण झाले.या कुटुंबाला भावनिक आधार देत विद्यार्थीनीनी पणती भेट दिली.त्यावेळी त्याच्या कुटुंबाना अश्रू अनावर झाले.मानवतेचरणी सहानुभूतीची पणती देवून आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश दिला.
       अतिशय उत्साहात गावातील  ग्रामदेवतांच्या चरणी दिपप्रज्वलित करून पणत्या अर्पण करण्यात आल्या.सर्व विद्यार्थ्यांच्या घरी पणतीतून कोरोनाचे संदेश दिले.शाळेने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
      संपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक सुदर्शन शेजाळ,दत्तात्रय हेंबाडे,संभाजी सुळकुंडे,धनंजय लेंडवे,राजश्री माळी व सर्व  विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.