मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथजी आवताडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथजी आवताडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान


मंगळवेढा(प्रतिनिधी):-
          भारत हा कृषीप्रधान देश आहे.  संस्कृतीच्या समृद्ध साधनेला विस्तारीत करून काळ्या आईच्या पोटातून धान्यनिर्मितीचे अजब कौशल्य प्राप्त केलेला या भूमीचा प्रामाणिक सेवक म्हणजे शेतकरी होय.

            गौरवशाली परंपरा जतन करणाऱ्या या बळीराजाचे हित जोपसत शासनदरबारी असणाऱ्या विविध कृषीपूरक योजना मंगळवेढा तालुक्यात राबवून कृषी उत्त्पन्न बाजार समिती वलयास एक उत्तुंग भरारी मिळवून देणारे कृषी उत्त्पन्न बाजार समिती, मंगळवेढा या कृषी व्यापार संकुलाचे सभापती मा. सोमनाथ आवताडे यांना त्यांच्या आदर्शवत व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना नव महाराष्ट्र CO-OPERATIVE AWARDS 2021 संलग्न Best Chairman Of Market Committee या राज्यस्तरीय पुरस्काराने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे गौरविण्यात आले.


           आपल्या अमोघ कार्यशैलीने कमी वयात आणि सक्षम कृतीनेतृत्वात कृषी उत्त्पन्न बाजार समितीस नावलौकिक प्राप्त करून देणारे कार्यक्षम सभापती मा.सोमनाथ आवताडे यांनी राज्याचे महसूलमंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार स्वीकारला.

यावेळी दामाजी शुगर संचालक मा. सचिन शिवशरण, युवा उद्योजक मा. सत्यजित सुरवसे आदीजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.