ढवळस येथे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वतीने फराळाचे वाटप

ढवळस येथे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वतीने फराळाचे वाटप

मंगळवेढा(प्रतिनिधी):-
                पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना दिपावली सर्वांना आरोग्यदायी,आनंदी ,सुखी,समृद्धी आणि भरभराटीची जावो अशी श्री पांडुरंग आणि श्री संत दामाजी चरणी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या.

                लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे पुढे म्हणाले , एप्रिल 2021 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपण माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले.त्याबद्दल आपले आणि माझ्या विजयात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान असलेल्या सर्व शुभचिंतकांचे मनपूर्वक आभार मानून ,मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर आपणाशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या गावातील तसेच परिसरातील समस्या व्यापक स्वरूपात जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला प्रचंड उद्रेकाला सामोरे जावे लागले. यामध्ये आपल्यापैकी अनेकांना आपली जिव्हाळ्याची माणसे गमवावी लागली.त्याच्या प्रचंड वेदना आजही आपल्या सर्वांच्या स्मरणात आहेत.परंतु या कालावधीत सर्व कोरोना योध्यानी स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची तमा न बाळगता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा आणि उपाय योजनांसाठी जीवाची बाजी लावत अमूल्य योगदान दिल्यानेच या भीषण महामारीतून आपल्याला बाहेर पडता आले.याबद्दल या लढाईत आपले अनमोल योगदान दिलेल्या सर्वच कोरोना योध्यांचे आणि विविध सामाजिक संघटना यांचे मी मनापासून आभार मानतो.

               मतदार संघाचा आमदार म्हणून आपल्यासह आपल्या परिसरातील अडीअडचणी सोडविणे माझे प्रथम कर्तव्य असून या कर्तव्यप्रति मी सदैव वचनबद्ध आहे.आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी आणि कोरोनासंबंधी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमुळे मागील काही महिने जाहीर कार्यक्रम घेण्यास मर्यादा होत्या.अश्या परिस्थितीत जनहितार्थ कार्यक्रम आणि उपक्रम राबवता न आल्याची मोठी खंत माझ्या मनात आहे.लवकरच आपल्या गावात आणि परिसरात येऊन आपल्या मूलभूत पायाभूत तसेच परिसरातील सार्वजनिक विकास आणि प्रकल्पाच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्यासाठी जलद गतीने शासनदरबारी पाठपुरावा करेन.

             आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली .या संधीचा उपयोग करत नागरिकांच्या भल्यासाठी मतदार संघातील धोरणात्मक आणि शाश्वत विकासासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचा आमदार म्हणून माझी निवड झाल्यानंतरची पहिलीच दिपवाळी असून आपला जनसेवक या नात्याने दिपावलीनिमित्त फराळाची भेट आपणांस पाठवित आहे.याचा आपण स्वीकार करावा आणि आपले आशीर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असावा असा विश्वास व्यक्त केला.

               ढवळस येथे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या कडून आमदार म्हणून निवड झाल्यानंतर जनसेवक या नात्याने दिपावलीची पहिली भेट म्हणून फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी आमदार समाधान दादा आवताडे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन हेंबाडे,अक्षय हेंबाडे,सिद्धेश्वर हेंबाडे,सागर घोडके,गणेश कुंभार,विशाल हेंबाडे,अमर बावचे, आदेश बावचे आदीजण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.