हिवरगाव येथे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात येणार
मंगळवेढा(प्रतिनिधी):-
मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या कडून आमदार म्हणून निवड झाल्यानंतर जनसेवक या नात्याने दिपावलीची पहिली भेट म्हणून फराळाचे वाटप माजी सभापती प्रदीपजी खांडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी हिवरगाव सर्व ग्रामस्थांनी दिनांक.०४-११-२०२१ रोजी ,सकाळी ८ वाजता. ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित रहावे.
लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांनी मनातील भावना व्यक्त करत सांगितले की,आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली .या संधीचा उपयोग करत नागरिकांच्या भल्यासाठी मतदार संघातील धोरणात्मक आणि शाश्वत विकासासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचा आमदार म्हणून माझी निवड झाल्यानंतरची पहिलीच दिपवाळी असून आपला जनसेवक या नात्याने दिपावलीनिमित्त फराळाची भेट आपणांस पाठवित आहे.याचा आपण स्वीकार करावा आणि आपले आशीर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असावा असा विश्वास व्यक्त केला.