मंगळवेढा (प्रतिनिधी):-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या धोरणात्मक विकासास निश्चित स्वरूप देण्यासाठी आणि माय - बाप जनतेच्या अडी-अडचणी अथवा मतदारसंघातील इतर सामाजिक व राजकीय प्रश्नांची मार्गी लागावी यासाठी नव्याने स्थापित झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी मा.आ.समाधान (दादा) आवताडे यांच्या मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जेष्ठ मार्गदर्शक तथा दामाजी मंदिर समिती अध्यक्ष आदरणीय विष्णूपंत (बापु) आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी दामाजी शुगर व्हा. चेअरमन मा. अंबादास कुलकर्णी, कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती मा. सोमनाथ आवताडे, दाते पेट्रोलियमचे सर्वेसर्वा मा. विश्वास दाते आदी मान्यवर उपस्थित होते.