मंगळवेढा (सचिन हेंबाडे):-
मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स मध्ये मागील वर्षाप्रमाणे आवताडे स्पिनर्स गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या मंडळाकडून यावर्षीही आवताडे स्पिनर्स येथे युनिट हेड सुनील कामते यांच्या हस्ते गणेशमूर्तींचे पूजन करून मूर्तीप्रतिष्ठापना करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आवतडे स्पिनर्स येथे गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून, सैनीटायझरचा वापर करून गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
या मंडळाकडून सालाबादप्रमाणे यावर्षीही कामगारांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामधे क्रिकेट,संगीतखुर्ची, लिंबुचमचा, दोरीवरील उड्या इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावेळी आवताडे स्पिनर्स युनिट हेड सुनील कामते, अकाउंट हेड दत्तात्रय भोसले, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुन्ना शेख, उपाध्यक्ष पोपट कदम, मेन्टेनन्स विभागाचे प्रमुख कैलास जगताप,अमोल ताटे, पॅकिंग विभागाचे प्रमुख अनिल केदार, विशाल हेंबाडे,समाधान काशीद, सुपरवाइझर शिवराज जाधव , सुपरवाइझर सागर नागणे, दत्तात्रय पंचम मास्तर, जैनुद्दीन शेख, , विकास बेदरे,संभाजी जाधव, रोहित सावंत, सतीश घुले, बाळकृष्ण गुरव, अक्षय जाधव,गणेश वाकडे,विजयकुमार मळगे ,सचिन हेंबाडे,विजय कोरे , आवताडे स्पिनर्स सर्व स्टाफ व कामगार उपस्थित होते.