मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा येथे शुक्रवार 10/09 रोजी पासून दर शुक्रवारी बाजार समितीच्या पटांगणात कोरोना चे नियम पाळून जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे यांनी दिली.
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला पशूपालन व्यवसाय बाजार सुरू झाल्याने शेतकरी व व्यापारी वर्ग आनंदी झाले आहेत
यावेळी बोलताना सभापती म्हणाले की आपण बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहोत. तसेच आ समाधान (दादा) आवताडे यांच्या मार्गदर्शनात बाजार समितीचा विकास करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे म्हणाले गेल्या अनेक महिन्यापासून बाजार बंद असल्याने या आठवडी बाजारात शेतकरी व व्यापारी वर्ग यांच्या वतीने चांगला प्रतिसाद पाहायला मिळाले.या बाजारात शेळी, म्हैस,खिलार गाय, व जर्सी गाय असे लहान-मोठे अनेक जनावरे दाखल झाले होते. च्याळीस हजार ते दीड लाख रुपये पर्यंतची पंढरपुरी म्हशी व पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंत च्या जर्सी गाय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, विष्णुपंत (बापू )आवताडे, महादेव जाधव, सत्यजित सुरवसे, आबा सांवजी, दिगंबर माने, सचिन देशमुख, पत्रकार सलीम शेख व अनेक शेतकरी व व्यापारी वर्ग उपस्थित होते.