मंगळवेढ्यात भाजयुमो कडून सांगोला रोडवर वृक्षारोपण आंदोलन
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मंगळवेढा शहरातील सांगोला रोड पुर्णतः खराब झाला असून या रोडवरती खड्डड्यांचे साम्राज्य झाले आहे . रस्ता लवकरात लवकर नवीन व्हावा याकरता भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा कडून आज वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले . सार्वजनिक बांधकाम विभाग , राष्ट्रीय महामार्ग विभाग , नगरपालिका यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन देखील ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज हे गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले गेले आहे . खोमनाळ नाका जवळील खड्यांमध्ये झाले लावून नगरपालिकेचा घोषणा देवून निषेध करण्यात आला .
सदरील रस्त्याबाबत बोलत असताना युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव म्हणाले , " हा रस्ता जुना सांगोला हायवे असून गेल्या दोन वर्षांपासून सदरील रोड पुर्णतः खराब अवस्थेत आहे . काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर एका तरुणाला हकनाक जीव गमवावा लागला आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग असेल राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल किंवा नगरपालिका असेल सर्व कार्यालय हा रस्ता आमच्याकडे नाही असे सांगत आले आहेत . परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता नगरपालिका कडे वर्ग केला असून त्याचे पत्र देखील त्यांनी दिले आहे . पण नगरपालिका मुख्याधिकारी याना ते माहिती नसल्याचे लक्षात येते . त्यामुळे अजून नगरपालिका या रस्त्याचा ताबा स्वतःकडे दाखवत नाही . आता तरी नगरपालिका ने हा रस्ता स्वतःकडे असल्याचे काबुल करून तो तयार करावा . तसे नाही केल्यास भाजयुमो दोन दिवसांनी आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन करेल " . असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे .
या आंदोलनावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे , युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे , सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदूस्थानी , देवानंद इंगोले , आनंद माने , प्रदीप गायकवाड , महेश जाधव , अजित लेंडवे , विजय चव्हाण , विश्वास मोहिते , आदी उपस्थित होते .