मंगळवेढा (प्रतिनिधी):-
महा आवाज अभियान पुरस्कार 2020-21 व डेमो हाऊस उद्घाटन पंचायत समिती,मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण डेमो हाऊस उद्घाटन पंढरपूर- मंगळवेढा लोकप्रतिनिधी मा.आ.समाधान (दादा) आवताडे ,पंचायत समिती सभापती मा. सौ. प्रेरणाताई सुधाकर मासाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आ. समाधान (दादा) आवताडे यांनी बोलताना सांगितले की, अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत. त्यापैकी ऊन, वारा आणि पाऊस या पासून संरक्षण करणे यासाठी प्रत्येकास आपल्या स्वतःच्या हक्काचे घर असावे अशी मनस्वी इच्छा असते. सर्वसामान्यांच्या याच अपेक्षेस बळ मिळावे आणि त्यांना स्वप्नवत असणारे सदन प्राप्त व्हावे यासाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी सर्वांना घर हक्काचे घर मिळावे ही त्यांची मनोकामना अशा उपक्रमातून पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमदार महोदय यांनी सदर कार्यक्रमामध्ये व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.दिलीप चव्हाण, गटविकास अधिकारी सौ.सुप्रिया चव्हाण,जि.प.सदस्य नितीन नकाते,पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर, लेबर फेडरेशन अध्यक्ष सरोजभाई काझी, पं.स.सदस्य लक्ष्मण मस्के, सुधाकर मासाळ, उमेश कुलकर्णी, एस.बी.आय. मॅनेजर प्रशांत कांबळे,काझी साहेब,विस्तार अधिकारी एस.एस. नरळे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी रामलिंग सरवदे, पं.विस्तार अधिकारी डी.ए.साळुंखे, युवराज सूर्यवंशी, वरिष्ठ सहाय्यक एस.सी. येडसे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अनिल गरंडे,विनायक जंगे विशाल जगताप,APO प्रशांत ढगे,PTO संतोष सोनसे,पाटील गुरुजी,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत झाले.