पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
भारत देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या स्थानिक खासदार विकास निधी २०२०-२१ मधून ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा याठिकाणी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी मा.आ.समाधान (दादा) आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक आणि विधायक कार्याची आवड जोपासत लोकांच्या लोकसेवेसाठी राजकारणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी नेहमीच आपले भरीव योगदान देणारे खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या स्थानिक खासदार विकास निधीतून देऊ केलेली ही रुग्णवाहिका अनेकांच्या आरोग्य सेवेसाठी समर्पक बाब ठरेल असा विश्वास आ.समाधान (दादा) आवताडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. दिलीप चव्हाण, भाजपा जिल्हा संघटक मा. शशिकांत (नाना) चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मा.औदुंबर वाडदेकर, जिल्हा परिषद सदस्य मा. अतुल पवार, पंचायत समिती सभापती मा. सौ. प्रेरणाताई मासाळ, माजी सभापती मा. प्रदीप खांडेकर, दामाजी शुगर संचालक मा. सुरेश भाकरे, डॉ. प्रमोदकुमार म्हमाणे, मा. सचिन शिवशरण, भाजपा तालुकाध्यक्ष मा. गौरीशंकर (दादा) बुरकुल, शहराध्यक्ष मा. गोपाळ भगरे, संत साहित्य अभ्यासक मा. दिगंबर (मामा) यादव, आरोग्य अधिकारी मा.डॉ. अहिरेसो आदी मान्यवर, अधिकारी - पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.