भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने योजना पुस्तिका प्रकाशन

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने योजना पुस्तिका प्रकाशन 
  
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
            
           पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा शाखेच्या वतीने आज खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी , आमदार समाधान दादा आवताडे , जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते केंद्रीय योजनांचे पुस्तिका प्रकाशन करण्यात आले . 
                 
              युवा मोर्चा च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सेवा सप्ताह म्हणून संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे . जनतेला उपयोगी असनाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचाव्या , त्यांना त्याचा लाभ व्हावा , केंद्राच्या कोणत्या योजना आहेत ते समजाव्या याकरता हे पुस्तिका उपयोगी ठरणार आहे . मा.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस हा संपूर्ण सेवा सप्ताह म्हणून साजरा होतो , सात आक्टोबर पर्यंत हा सेवा सप्ताह असणार आहे . युवा मोर्चा ने राष्ट्रीय स्थरापासून मोदींच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी कार्यक्रम , रक्तदान शिबिर , अंत्योदय योजना कार्यक्रम , आझादी का अमृतमहोत्सव , नमो प्रश्नोत्तर , स्वछता अभियान असे कार्यक्रम जिल्हाभर होणार असल्याचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी सांगितले . 
                योजना पुस्तीका प्रकाशन वेळी जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाढदेकर , तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष गोपाळ भगरे , युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे , दिगंबर यादव , अजित लेंडवे , कैलास कोळी ,विजय बुरकुल , बबलू सुतार , उमेश आवताडे , केशव आवताडे आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.