मंगळवेढा (प्रतिनिधी):-
टाटा पॉवर व्हालिंटरींग सप्ताह16 निमित्त तहसिल कार्यालय, मंगळवेढा, टाटा पॉवर कमुनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई, ढवळस ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ई- पीक पाहणी जनजागृती अभियान आज रोजी 24 सप्टेंबर 2021 सायंकाळी 5:30 वा. राबविण्यात येणार आहे.
सदर जनजागृती उपक्रम टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या सहयोगाने व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र च्या माध्यमातून होत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रांताधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसिलदार स्वप्नील रावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात महाराष्ट्रभर गाजलेले सुप्रसिद्ध विनोदी कलाकार श्री. दत्तात्रय येडवे व श्री . संजय बिदरकर गुरुजी यांचा ई - पीक पाहणी जनजागृती प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार आहे .
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत गावच्या वेशिपासून ई पीक पाहणी जनजागृती दिंडी ही वाजत गाजत काढण्यात येणार आहे. तरी आपले गावातील व परिसरातील शेतकरी बंधू - भगिनींनी तसेच युवक मित्रांनी ह्या सुवर्ण संधीचा आवर्जून फायदा घ्यावा.
पत्रकार सचिन हेंबाडे
मो. नं. 9637545262
8668236467