मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्षपदी आनंदा मोरे यांची निवड

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदी आनंदा मोरे यांची निवड

मंगळवेढा(प्रतिनिधी):-
                मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मंगळवेढा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली .या बैठकीत ढवळस गावचे नूतन तालुकाध्यक्ष आनंदा ज्ञानेश्वर मोरे  यांना  अध्यक्ष निवडीचे पत्र देऊन जबाबदारी दिली. मंगळवेढा नूतन शहराध्यक्ष शुभम सावंत यांची निवड करण्यात आली.

             यावेळी प्रमुख उपस्थिती सभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष अमोल काटे,संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा अमरजीत पाटील,माजी प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे विभाग अध्यक्ष दिपक  वाडेकर,जिल्हाध्यक्ष किरण जाधव ,सार्वजनिक शिवजयंती उत्सव माजी अध्यक्ष बलवान वाकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना शहराध्यक्ष हर्षद डोरले,सार्वजनिक शिवजयंती उत्सव अध्यक्ष  ज्ञानेश्वर (माऊली)कोंडूभैरी,संदीप फडतरे ,राजाभाऊ गावडे, आकाश पाटील,नवनाथ यादव,विष्णू ठेंगील,प्रवीण टकले,पप्पू टकले आदिजन उपस्थित होते.
              नूतन कार्यकारणी कार्यक्रमाची प्रस्तावना पवन आप्पा बिनवडे,अध्यक्षीय सूचना माऊली कोंडूभैरी, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.