मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स गणेश उत्सव उत्साहात साजरा

मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स गणेश उत्सव उत्साहात साजरा

मंगळवेढा (सचिन हेंबाडे) :- 

             मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स येथे  गणेशोत्सव मंडळाच्या श्रीं ची आरती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदर मा.समाधान (दादा) आवताडे यांच्या शुभहस्ते करून श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

               गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारख्या अस्मानी व सुलतानी संकटाच्या विळख्यात पिचलेल्या माय - बाप जनतेला यातून मुक्ती मिळू दे आणि त्यांच्या सुख, शांती लाभू दे अशी आर्त प्रार्थना आमदार महोदय यांनी गणरायाच्या चरणी केली.

             याप्रसंगी आवताडे स्पिनर्स युनिट हेड सुनील कमते , प्रोडक्शन मॅनेजर विनायक नलवडे , ऑटो कॉर्नर विभाग प्रमुख कैलास जगताप, आवताडे स्पिनर्स गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष मुन्ना शेख,उपाध्यक्ष पोपट कदम, सुपरवायझर समाधान कांबळे, सुपरवायझर शिवराज जाधव, सुपरवायझर आकाश सुतार, सुपरवायझर उंबरकर, मेंटनस सुपरवायझर सुर्जित जाधव,मास्टर दत्तात्रय पंचम,रोहित सावंत,संभाजी जाधव ,समाधान काशीद,विशाल हेंबाडे,सचिन हेंबाडे,गणेश जाधव,विकास बेदरे,विजयकुमार मळगे,विक्रम गडदे,बालाजी नरळे,अक्षय जाधव,प्रवीण माने, सैफ अली मुलानी ,बाळासाहेब माने,उमेश मेटांगे,विशाल कूचेकर,मिलिंद कामुने,अभिजित पुजारी,परशुराम धनवे,विनायक शिंदे,सागर भगत,अनिल जाधव,सुरेश पत्की,बजरंग सोनवणे,सतीश घोडके आदीजन उपस्थित होते.

             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.