मरवडे गाव सीसीटीव्ही कक्षेत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा - राजश्री पाटील
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मरवडे गाव सीसीटीव्ही कक्षेत येण्यासाठी आज मरवडे येथे पोलीस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा राजश्री पाटील यांनी ग्रामपंचायत हॉलमध्ये बैठक घेऊन वाढत्या चोरी व गुन्हेगारीवर,खोट्या केसेसवर आळा बसविण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या आदेशान्वये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची सुरवात करण्याच्या अनुषंगाने मरवडे ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणून या उपक्रमास योगदान म्हणून ग्रामपंचायत, गावातील काही दानशूर ,इतर काही लोकवर्गणीतून गावातील मेन चौक, सार्वजनिक ठिकाण, मंगळवेढा विजापूर रोड वरती आदी ठिकाणी उत्तम दर्जाचे कॅमेरे बसवून चोरापासून अलर्ट राहण्यासाठी प्रयत्न करूयात.या सीसीटीव्ही फुटेज मुळे खोट्या केसेस अनोळखी व्यक्तीचा रात्री-बेरात्री गावात होणारा शिरकाव यासह सर्व बाजूने या उपक्रमाचा मरवडे गावाला लाभ होईल, यासाठी रात्री गस्त,सायलेन्सचा आवाज, ग्रामसुरक्षा दल निर्माण करून त्यांना पोलीस प्रशासनाकडून काही साहित्य व योग्य मार्गदर्शन देण्यात येईल,गावातील तंटामुक्त समिती, पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन पोलीस गाडीचा सायलेन्स देऊन जागृत राहुयात, या आवाजामुळे काही लोक तरी अलर्ट राहतील.
मरवडे गाव महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत व रोडवरील मोठे गाव म्हणून ओळखले जाते,या भागात अवैध धंदे ची संख्या ही जास्त आहे, गुन्हेगारी वाढत असताना या राज्यातून त्या राज्यात होणारा अवैद्य मालवाहतूक आदी गोष्टीबाबत या सीसीटीव्ही द्वारे पुराव्यानिशी आपणास महत्वाची माहिती मिळू शकते, सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मॅडम यांनी सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी होतोय,नक्कीच आपल्याही भागात लॉकडाउन नंतर वाढत असलेल्या चोरी प्रमाणावर आळा बसेल, याला ग्रामपंचायतील खर्ची पडणाऱ्या निधीबाबत पोलीस प्रशासन मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत,ग्रामपंचायतीने ही आपल्याकडे उपलब्ध असलेला निधी निधी कसा वापरता येईल बघितल्यास हा उपक्रम लवकरच राबविता येईल,असे सांगून त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी गावचे सरपंच नितीन घुले बोलताना म्हणाले, पोलीस प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम नक्की स्मार्ट ठरलेल्या मरवडे गावाला फायदेशीर असेल,गाव रोडवरील असून बाजारपेठ मुळे मोठी वर्दळ होते, नक्कीच सीसीटीव्ही फुटेज मुळे पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमाला यश येईल, गाव अलर्ट राहील,यासाठी आम्ही मरवडे कर सर्वतोपरी सहकार्य करू,ग्रामपंचायत प्रशासन आपल्यासोबत आहे,असा विश्वास घुले यांनी बोलताना दाखवला. कोरोणाच्या लॉक डाउन काळात अनेक अडचणी आल्या, गावातील लोकांनी कोरोना मुक्त गाव होण्यासाठी सहकार्य केले आहे,जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायतीस 15 वित्त आयोगाचा निधी या सीसीटीव्ही फुटेज साठी वापरता आला, तर हा उपक्रम उत्तम पणे राबवता येईल, अशी आशाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमास गावचे सरपंच नितीन घुले,शेतकरी संघटनेचे नेते तथा मरवडे गावविकास आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय गणपाटील, उपसरपंच सिद्धेश्वर सूर्यवंशी, पोलीस पाटील महेश पवार,तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी केंगार, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष शिवशरण,ग्रामसेवक भांडे,सामाजिक वनीकरणाची वन सेवक भागवत मासाळ, पत्रकार विलास काळे, सुरेश केंगार दादासाहेब रोंगे, प्रशांत सूर्यवंशी, विशाल जाधव यांच्यासह ग्रामसुरक्षा दल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता.