सोलापूर –
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न होत असताना, संख्येच्या तुलनेने आधीच अत्यंत कमी प्रमाण म्हणजे ५२ टक्के ओबीसी जमातींना केवळ २७ टक्के आरक्षण दिले गेले असताना पुन्हा त्यात वाटेकरी निर्माण करण्याचा खोडसाळपणा चालला आहे. त्या विरुद्ध कणखर भूमिका घेणारे आणि आठरा पगड जातींना सोबत घेणारे नामदार विजय वडेट्टीवार यांनी लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. देशाचे राजकारण आता ओबीसीकेंद्री झाली पाहिजे याकरिता त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता आज खंबीरपणे उभी ठाकली आहे.इम्पिरिकल डाटा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी, जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे ही मागणी लावून धरत इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीच्या बळावर ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीने हा आपला लढा तीव्र करण्यासाठी येत्या मंगळवारी ‘निर्धार मेळावा’ होणार आहे.
हा लढा विचारांचा आहे.. हक्काच्या मागणीचा आहे.. कोणा धर्माच्या, कोणा समाजाच्या, कोणा व्यक्तीच्या विरोधातला नाही. कोणाचा द्वेष करणारा तर मुळीच नाही म्हणून समस्त ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील सर्व प्रवाह एकत्रित येण्याने याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे.मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. कार्यकर्ते, ओबीसी व व्हीजेएनटी समाज घटकातील पुढारपण झटकून कामाला लागले आहे. तालुकानिहाय दौरा, बैठका सुरु आहेत. महिलांचा, मुस्लीम ओबीसींचा सहभागही लक्षणीय राहणार असल्याची ओबीसी वीजेएनटी संघर्ष समन्वय समिती प्रदेश अध्यक्ष शरद कोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी युवराज चुंभळकर भोजराज पवार भारत जादव संदीप राटोड dr माधुरी पारपपल्ली आदी उपस्थित होते.