*आ.समाधान आवताडे यांचा सोलापूर येथे सत्कार संपन्न*
मंगळवेढा(सचिन हेंबाडे):-
सोलापूर येथे आपल्या नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त स्थिरस्थावर झालेले परंतु आपल्या जन्मभूमीशी असणारी आपलेपणाची नाळ अधिकतम दृढ करण्याच्या प्रांजळ भावनेने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विधायक विकासासाठी आणि सर्वांगीण उन्नतीसाठी सज्ज झालेले पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मा.आ. समाधान (दादा) आवताडे यांचा मंगळवेढा मित्र परिवार, सोलापूर यांच्यावतीने संतवैष्णवांचा मेळा चित्रित असलेली श्री संत दामाजी पंत यांची मूर्ती, मायेची शाल आणि कर्तृत्वाचा फेटा बांधून अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
*घार उडते आकाशी......*
*तिचे चित्त पिलापाशी .....!!*
चातकाप्रमाणे वाट पाहणारे प्रतिक्षा सार्थकी लागल्याची बोलकी भावना यावेळी प्रत्येक उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आपली राजकीय ध्येयधोरणे, आपला राजकीय आणि राजकीय भुमिका यापलीकडे जाऊन मंगळवेढाकरांनी दिलेला हा एकजुटीचा संदेश जिल्ह्यातील एकात्मिक धारणेला समृद्ध करेल एवढे मात्र नक्की....
यावेळी जि. प. उपाध्यक्ष मा. दिलीप चव्हाण, सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपायुक्त मा.वसंत सावंत साहेब, महापालिकेचे मुख्य लेखापाल मा. धनवे साहेब, नगरसेवक मा. विनोद भोसले, जनकल्याण मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र हजारे, मा. तानाजी जाधव, मा. नारायण नागणे, मा. तानाजी तानगावडे, मा. रमेश खाडे, मा. ज्ञानदेव पवार, मा. संभाजी मेटकरी, मा. विजय घाडगे, मा. आप्पा बुरकुल, मा. महेश तांबुळकर, सोलापूर लेबर फेडरेशनचे संचालक मा. सरोजभाई काझी, भाजपाचे मा.नागेश खरात, ॲड. शैलेश हवनाळे, मा.सतीश ढगे साहेब, मा.खांडेकर सर, आदी मान्यवर व नागरीक उपस्थित होते.