*करकंब पोलिसांची मोठी कारवाई.*..! *पेहे येथे जुगार खेळणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल*
करकंब (प्रतिनिधी) :-
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी एक पथक तयार करून कारवाईसाठी पाठवले होते.पथक तयार केल्याप्रमाणे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या गुप्त बातमीदार मार्फत प्राथमिक केंद्र शाळेच्या पाठीमागे महादेव मंदिराच्या समोर जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर करकंब पोलिसांनी तात्काळ मोटर सायकल वर पेहे येथे जाऊन जुगार खेळणाऱ्या वर कारवाई केली. यावेळी पोहवा./आर. आर. जाधव., बी. एच. घोळवे, पोना/सज्जन भोसले, दयानंद हजारे, यांनी तत्काळ मोटरसायकलवर जाऊन येथील गावामध्ये जुगार खेळणारे इसमावर कारवाई केली असता.
या जुगार खेळणाऱ्या सात इसमासह सात मोटर सायकली, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य सह एकूण १,७८,३५०/-रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. या जुगार खेळणाऱ्या पैकी अजून आठ इसम पळून गेलेले आहेत. त्यांची नावे निष्पन्न झालेली आहेत. पेहे नांदोरे नेवरे या गावातील पंधरा-इसमावर जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दयानंद हजारे हे करीत आहेत.सदरची ही कारवाई करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/महेश मुंडे व पोउनि अजित मोरे यांच्या सूचनेप्रमाणेपोहवा/आर आर जाधव,पोहचवा/बी एच घोळवे, पोना/सज्जन भोसले, पोना/दयानंद हजारे यांनी ही कारवाई केली आहे.